हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?; Ashish Shelar यांचा संतप्त सवाल
हिंदू सणांच्या परवानगीवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
मुंबई: हिंदू सणांच्या परवानगीवरून भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये (hindu) संभ्रमाचे वातावरण कायम आहे. जेव्हा जेव्हा हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना आल्या नाहीत. त्यामुळे आज मीडियाशी बोलताना शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
मुंबई पोलीसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्यात आले आहे, असं शेलार यांनी सांगितलं.
शिवसेना बोटचेपी भूमिका का घेते?
मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल त्यांनी केला. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही सणांना परवानगी देण्यात याव्यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्ही या मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भाजपा सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
खोटं बोलणारी जमात वाढतेय
आदित्य ठाकरे म्हणजे मुंबई नव्हे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. भ्रष्टाचार मुक्तीला राज्यातील जनतेचं समर्थन आहे, असं ते म्हणाले. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घड्याळ प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आईच्या नात्याला काळिमा लावू नका. कडवट हिंदूने ते करू नये. आईच्या नावाने खोटे बोलणारी जमात वाढत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पटोले खोटं बोलणारी गुडिया
यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. खोटं बोलणारी गुडिया म्हणजे नाना पटोले. ती गुडिया चावी दिली की बोलते. त्याला जण समर्थन आणि जन भावना कधी नसते, असा टोला त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका