Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांच्या घरी नेते का येतात?’, ‘दोन्ही बंधू एकत्र आले तर…’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2017 ला मी मातोश्रीवर गेलो होतो. कुणाला पर्याय देण्यापेक्षा समस्यांना उपाय म्हणून दोन्ही बंधूनी विचार करावा. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे एकत्र आले ही चांगली घटना तशीच ही देखील चांगली घटना ठरेल.
छ. संभाजीनगर : 9 ऑक्टोबर 2023 | छत्रपती संभाजी नगर लोकसभा निवडणूक जबाबदारी माझ्यावर आणि धोत्रे यांच्यावर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीने लोकसभा निवडणूक जिंकायची म्हणून निवडणुकीत उतरलो आहे. आम्हाला उमेदवार आणावे लागत नाहीत. आमच्याकडे शिकलेले मुले आहेत. आमचा राष्ट्रवादीसारखा जहागीरदार पक्ष नाही अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलीय. माझा माझ्या नेत्यावर विश्वास आणि लोकांवर विश्वास आहे. छ संभाजीनगर 25 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असताना समस्या आहेत तशाच आहेत. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही तर लोकांच्या समस्या विरोधात लढत आहोत असेही ते म्हणाले.
राज्यात आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था आहे. शासन आणि प्रशासनाने आपले काम करावे. मी मंत्री असताना बारवर कारवाई करत नव्हतो यंत्रणेला पाठवत होतो. बाथरूम साफ करून घेणे हे नेत्यांचे काम नाही. बाथरूम साफ करायला लावल्याने गेलेली लोक परत आली का? लोकांना मदत करायला हवी, अशा शब्दात त्यांनी खासदार हेमंत पाटील यांना टोला लगावला.
सत्ता आणि पैसे हेच विचार राहिले का?
आज कोणत्याही पक्षाची ठाम विचार धारा राहिली नाही. शरद पवार आणि मनसेची बोलणी सुरू आहे हे मनातून कडून टाका. चांगला माणूस आला तर देशाचा फायदा होतो. आम्ही शरद पवार यांच्यासोबत गेलो नाही तर त्यांना पाठिंबा दिला होता. मनसेवर प्रेम करणारे लाखो करोडो लोक आहेत. येणाऱ्या काळात ते दिसेल. माझी मुले परिपक्व होऊन बाहेर पडत आहेत याचा आनंद आहे असे ते म्हणाले.
मनसेचा मस्जिदला नाही तर भोंग्याला विरोध
आम्ही कुणाच्या मस्जिदवर दगडफेक केली का? मग, मंदिरावर दगडफेक का केली. आमची मोठी सभा झाली तर मुस्लिम समाजाला वाटलं की आमच्याविरोधात होत आहे. विषय हा मस्जिदचा नव्हता तर भोंग्याचा होता. समाजाला जे त्रासदायक आहे त्यावर नक्की बोलायला हवे. म्हणून आम्ही डीजेच्या आवाजावरही बोललो. आम्ही फक्त कार्यकर्ता म्हणून नाही तर माणूस म्हणून विचार करतो. पक्ष जाती पातीवर कधी विचार करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुणाच्या विरोधात बोलू नये
आर्थिक सक्षम सर्वाना करायला हवे. सर्वांच्या घरात चूल पेटायला हवी. आरक्षण देऊन टाका कुठं अडले आहे. कसे ही बसवा पण आरक्षण द्या. राज ठाकरे हा एकमेव नेता आहे जो मराठा समाजाला आरक्षण संदर्भात बोलणारा नेता आहे. ज्यांना आरक्षण हवय त्यांना द्या. सगळे राज ठाकरे यांना भेटायला येतात. शिरा खातात, पोहे खातात आणि बाहेर म्हणतात कौटुंबिक भेट. राज ठाकरे कुणाच्या विरोधात बोलू नये हे सांगायला सगळे नेते राज ठाकरे यांच्या घरी येतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.