मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही?, खोडा कुणाचा?; शरद पवार यांचा मोठा दावा काय?

मराठी भाषेच्या संदर्भात शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की आम्ही दिल्लीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयी प्रयत्न करीत आहोत, परंतू काही सदस्यांनी.....काय म्हणाले शरद पवार...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही?, खोडा कुणाचा?; शरद पवार यांचा मोठा दावा काय?
sharad pawar Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 8:59 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या अनेक धारधार प्रश्नांना तितकीच धारदार उत्तरे दिली. या मुलाखतीत राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत सर्वच विषयावर शरद पवार सविस्तर बोलले आहेत. मराठी संस्कृती आणि मराठी भाषा यावर देखील शरद पवार यांनी मनमोकळे केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. मराठी भाषाही तामिळ आणि कन्नड भाषे इतकीच पुरातन आहे. मराठी भाषेतील साहित्य आणि कविता संत तुकारामाचे अभंग साता समुद्रापार पोहचले आहेत. याविषयावर शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की मराठी भाषेला केंद्र सरकारने अद्याप अभिजात भाषेचा दर्जा का दिलेला नाही.? या प्रश्नावर शरद पवार यांनी पुण श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेत आपले मत मांडले आहे.

 अभिजात दर्जा मिळावा पण काही सदस्य….वेगळी

मराठीच्या भाषेला मोठी परंपरा आहे. मराठी पुरातन भाषा आहे यात काही वादच नाही. तरीही मराठी भाषेला अद्याप अभिजात दर्जा मिळालेला नाही. तामिळ ( २००४ ), संस्कृत ( २००५ ), कन्नड ( २००८), तेलगू (  २००८ ), मल्याळम ( २०१३ ), ओडिसा ( २०१४ ) या सहा भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या राज्यातील राज्यकर्त्यांनी आपल्या भाषेसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला असल्यानेच त्यांच्या भाषांना अभिजात भाषेचा ( पुरातन ) दर्जा मिळाला आहे. यासंदर्भात पुण्यात शरद पवार यांनी देखील प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरद पवार म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लक्ष्मीकांत खबिया काम करीत आहेत. आम्ही संसद सदस्यांनी तशी मागणी केली आहे, मात्र दिल्लीत काही सदस्य वेगळी भूमिका मांडत असतात असेही शरद पवार यांनी सांगितले.

अभिजात दर्जा मिळावा यात काही वादच नाही

संस्कृत आणि मराठी यामध्ये कारण नसताना प्रश्न निर्माण केले जातात. मराठी आणि संस्कृत दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मराठी भाषा वेगळी आहे. तिला वेगळा इतिहास आहे. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मागण्याचा अधिकार मराठी भाषेच्या प्रेमींचा आणि मराठीजनांचा आहे असेही शरद पवार यांनी यावेळी ठामपणे सांगितले. मराठी कार्यक्रमाच्यामध्ये असे आमचे उद्योग असतात की ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते.ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा यांनी साहित्याच्या माध्यमातून मराठीत प्रचंड धैर्य निर्माण केले आहे.त्यांनी जे साहित्य लिहीलेले आहे त्याला जनमत आहे. त्यामुळे मराठीच्या भाषेला अभिजात साहित्याचा दर्जा मिळालाच पाहीजे असे शरद पवार यांनी सांगितले.

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.