रोहित पवार का म्हणतात राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले?

केंद्र सरकार ईडीचा वापर हा राजकरणासाठी तर करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचं रोहित पवारांनी सांगितले. Rohit Pawar comment on Politics

रोहित पवार का म्हणतात राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले?
रोहित पवार
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 4:09 PM

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचं राजकारण, ईडी नोटीस, राजकारणाचं बदलेलं रुप, युवकांची क्षमता या विषयांवर संवाद साधला. ईडीची नोटीस आतापर्यंत कोणत्याही भाजप नेत्याला आलेली नाही. ती अन्य पक्षातील लोकांना म्हणजे शरद पवार, एकनाथ खडसे यांना आणि शिवसेनेच्या आमदारांना आलेली असल्याचं पाहायला मिळाले आहे. या सर्वांचा अभ्यास केला तर केंद्र सरकार ईडीचा वापर हा राजकरणासाठी तर करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. तर, राजकारण बदललं असून या क्षेत्रात आल्यापासून पन्नास टक्के केस पांढरे झाले, असल्याचं रोहित पवार म्हणाले. (Why MLA Rohit Pawar said fifty percentage hair color converted into white after joining politics)

“राजकारणात आल्यावर आपले पन्नास टक्के केस पांढरे झाले”

जनतेचे प्रश्न सोडवत असताना स्वतःच्या विचार न करता जनतेचे प्रश्न सोडवण्याला पहिले प्राधान्य द्यावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो हे करताना अनेक वेळा स्ट्रेसला सामोरे जावे लागते. पूर्वी सारख राजकारण आता सोपं राहिलेलं नाही. लोकांच्या हितासाठी वेळ द्यावा लागतो. केस पांढरे झाले म्हणजे स्ट्रेस वाढल्याचं म्हटलं जाते. सध्या राजकारणात मोठा ताणतणाव असल्याच पाहायला मिळत आहे,त्यामूळे केस पांढरे झाले असं आपण म्हटल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

युवकांच्या मध्ये मोठी ताकद आहे या ताकदीला जर आपण दिशा देऊ शकलो नाही तर ही ताकद वाया जाऊ शकते. तरुणाई चुकीच्या मार्गाने लागली तर मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात. युवकांना ताकद देण्यासाठी आघाडी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. मात्र, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. युवकांनी आपला वापर कोणी करून घेणार नाही याची काळजी घ्यायला हवी असही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना सन्मान द्यावा

रोहित पवार यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असं म्हटलेय. शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक असो की तामिळनाडू असो शेतकरी हा शेतकरी असतो याचा विचार केंद्र सरकारनं करण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले.केंद्र सरकारनं 60 दिवसांपासून आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानानं वागवण्याची गरज आहे. शेतकरी आंदोलन सुरु झाले त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. रस्ते खोदण्यात आले या चुकीच्या गोष्टी होत्या, अशी टीका रोहित पवार यांनी केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केले.

रोहित पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. डॉ. भूषण मगर यांच्या विघनहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि युवकांशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र, पंजाब ,तामिळनाडू कुठलाही शेतकरी असो , त्यांना सन्मानाची वागणूक द्या, रोहित पवारांचे केंद्राला खडे बोल

…आणि यशोमती ठाकूर यांना सेल्फीचा मोह आवरला नाही

(Why Mla Rohit Pawar said fifty percentage hair color converted into white after joining politics)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.