मुंबई – माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची भेट झाल्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपात जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. इतकेच नाही तर चव्हाण यांच्यासह 12 काँग्रेसचे आमदारही भाजपात जाणार असल्याची चर्चा संध्या रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला (Congress)मोठे खिंडार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची चर्नंचा आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा भूकंप होतो की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या दोन्ही नेत्यांनी भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगितले असले तरी चर्चांना मात्र उधाण आलेले आहे. काँग्रेसमधील अनेक काँग्रेसचे आमदार नाराज असून, त्यातीत अशोक चव्हाणांना मानणारे 12 आमदार त्यांच्यासोबत भाजपातजातील असेही सांगण्यात येते आहे.
काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्व काही आलबेल नसल्याचे दिसते आहे. मविआत सत्तेत असतानाही काँग्रेसला सराकरमध्ये फारसे महत्त्व नसल्याचे सांगण्यात येत होते. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी हेही एक मुख्य कारण सांगण्यात येते आहे. नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. शिंदे सरकार आल्यानंतरही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती शिवसेनेने केली. त्याही वेळी काँग्रेसला विचारणा करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते आहे.
केंद्रीय नेतृत्वाचेही राज्याकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला खिंडार पाडून, विरोधकांवर आघाडी घेण्याचा भाजपाचा डाव असू शकतो असेही सांगण्यात येते आहे.
नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची भावना काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांमध्ये आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही मनात ही भावना असल्याचे सांगण्यात येते आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर अशोक चव्हाण हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांवेळी काँग्रेसची मते फुटली होती, तसेच शिंदे सराकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळीही अशोक चव्हाण आणि काही काँग्रेस आमदार गैरहजर होते. अशीर झाल्यामुळे येऊ शकलो नाही, असे सांगितले असूनही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगण्यात येते आहे.
अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी विशेषता राहुल गांधी यांच्याशी त्यांचे फारशे सख्य नसल्याचेही सांगण्यात येते आहे. त्यानंतर त्यांना पक्षात म्हणावी तशी मोठी जबाबदारी देण्यात आली नसल्याचेही सांगण्यात येते आहे.
हेही अशोक चव्हाण भाजपात येण्याचे मोठे कारण असल्याच सांगण्यात येते आहे. पंकजा मुंडे वगळता मराठवाड्यात भाजपाचा मोठा चेहरा नाही. अशा स्थितीत अशोक चव्हाणांसारखा नेता भाजपाच्या गळाला लागल्यास पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात भाजपाचा बेस वाढवण्यासाठीही अशोक चव्हाण यांचा उपयोग होऊ शकतो. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हेही चव्हाण यांचे नीकटवर्तीय समजले जातात. काही दिवसांपूर्वीच नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाण यांनी भाजपात यावे, असे आमंत्रण दिले होते.