मनसेसोबत युती होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीहून नागपूरला दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर येताच मीडियाने त्यांच्या भोवती गराडा घातला. यावेळी त्यांना मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आला. (devendra fadnavis)
नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीहून नागपूरला दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर येताच मीडियाने त्यांच्या भोवती गराडा घातला. यावेळी त्यांना मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. (Will BJP and MNS go it together?, read what Devendra Fadnavis said)
देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेसोबतच्या युतीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. मनसेने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याकडे फडणवीसांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, मनसेसोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंही त्यांनी म्हटलं.
राजकीय अर्थ काढू नका
केंद्रात कामं असतात त्यासाठी जावं लागतं त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असं सांगतानाच केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत. त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ओबीसी आरक्षणाचा अधिकार हा राज्यालाच आहे. केंद्राला नाही, असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
चंद्रकांत पाटील-राज भेटणार
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांचा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिक दौऱ्यावर असून योगायोगाने तेही विश्रामगृहात उतरले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आज रात्री उशिरापर्यंत भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीत नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेती युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील आणि राज ठाकरे यांची पहिल्यांदाच ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Will BJP and MNS go it together?, read what Devendra Fadnavis said)
VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 16 July 2021https://t.co/rMMxZZbgzy | #UddhavThackeray | #SharadPawar | #Mumbai | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 16, 2021
संबंधित बातम्या:
राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात
राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाही, मनसे-भाजप युतीवर चंद्रकांतदादांचं मोठं विधान
(Will BJP and MNS go it together?, read what Devendra Fadnavis said)