Explainer : छगन भुजबळ यांना निवडणुकीत मराठा असंतोषाचा फटका बसणार?; येवला जड जाणार?

मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. भुजबळ यांनी या मागणीला विरोध केला आहे. त्यामुळे आता भुजबळ यांना येवल्यात धडा शिकवण्याची विधाने येऊ लागली आहे. मात्र, येवला विधानसभा मतदारसंघात खरंच भुजबळांना पराभूत करणं शक्य आहे काय?

Explainer : छगन भुजबळ यांना निवडणुकीत मराठा असंतोषाचा फटका बसणार?; येवला जड जाणार?
chhagan bhujbal and manoj jarange patilImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 8:08 PM

नाशिक | 24 नोव्हेंबर 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी प्रत्येक सभेतून छगन भुजबळ यांच्याविरोधात आग ओकण्यास सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केल्याने भुजबळ हे मराठा आरक्षणाचे विरोधक असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तसेच भुजबळांना येवल्यात धडा शिकवण्याची भाषाही होत आहे. पण मराठा समाजाच्या नाराजीमुळे खरोखरच येवला विधानसभा मतदारसंघ भुजबळांना जड जाणार आहे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे येवल्याचं सामाजिक आणि राजकीय गणित काय आहे? त्यावर टाकलेला हा प्रकाश.

येवल्याचं जातीय समीकरण काय?

छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 128000 मराठा समाज आहे. तर मराठा आरक्षण समर्थकांच्या मते येवल्यात मराठा समाजाची लोकसंख्या 125000 एवढी आहे. मराठा आरक्षण समर्थकांनी दिलेल्या आकडेवारीपेक्षा भुजबळ यांच्या समर्थकांची मराठा समाजाची आकडेवारी अधिक आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 102000 ओबीसी तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार ओबीसींची संख्या 80000 एवढी आहे.

छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 18000 मुस्लिम आहेत. तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यातील मुस्लिमांची संख्या 25000 एवढी आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 43000 एससी आणि एसटी आहेत. तर आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार 50000 एससी आणि एसटी आहेत. भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात इतर वर्गातील 11000 लोक असून मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात 22000 मतदार आहेत. एकंदरीत भुजबळ हे अत्यंत प्रबळ उमेदवार आहेत. त्यांची मतदारसंघात कामे आहे. मतदारांवर त्यांचा होल्ड आहे. त्यामुळे येवल्यातील जातीय समीकरणही भुजबळ यांच्या पाठीच असल्याचं दिसत आहे.

भुजबळाआधी येवल्यात कुणाचं बळ?

1995 आणि 1999 मध्ये शिवसेनेचे कल्याणराव पाटील सलग दोन टर्म इथले आमदार होते.

भुजबळांची एन्ट्री कशी झाली?

मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला. शिवसेनेचे त्यावेळचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतर भुजबळयांनी येवला गाठलं. भुजबळ नुसते येवल्यात आले नाहीत, तर चार टर्म ते येवल्यातून निवडून आले आहेत. सर्वात आधी 2004मध्ये त्यांनी येवला जिंकला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 2009, 2014 आणि 2019मध्येही भुजबळ निवडून आले. मधल्या काळात भुजबळ तुरुंगात गेले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यामुळे भुजबळ यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आलं असंच चित्र होतं. पण येवलेकरांनी भुजबळांना 2019मध्ये पुन्हा साथ दिली आणि भुजबळ निवडून आले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात थेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

येवल्याचा पहिला निकाल काय?

भुजबळ यांनी येवल्यातून 2004मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली. यावेळी त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार कल्याणराव पाटील. या निवडणुकीत भुजबळांना 79306 मते पडली. तर कल्याणराव पाटील यांना 43657 मते पडली. भुजबळ 35649 मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झाले.

2009 मध्ये काय घडलं?

2009मध्ये भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचे माणिकराव शिंदे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत भुजबळ यांना 106416 मते मिळाली. तर माणिकराव शिंदे यांना 56236 मते मिळाली. भुजबळ 50180 मतांनी विजयी झाले.

2014मध्ये मतांचा टक्का वाढला

2014च्या निवडणुकीत भुजबळांच्या मतांचा टक्का वाढला. यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेनेचे संभाजी पवार रिंगणात होते. या निवडणुकीत भुजबळांनी 112787 मते मिळवली. तर संभाजी पवार यांना 66645 मते मिळाली. या निवडणुकीत 46442 मताधिक्य घेऊन भुजबळ विजयी झाले.

तरीही भुजबळांनाच पसंती

2014नंतर भुजबळ एका मोठ्या संकटात सापडले. त्यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी वळली. त्यामुळे भुजबळांना तुरुंगात जावं लागलं. त्यामुळे आता भुजबळ यांचं राजकीय अस्तित्व संपलं अशी चर्चा सुरू होती. पण भुजबळ त्यातूनही तरले. 2019च्या निवडणुकीत येवलेकरांनी भुजबळांना फक्त मतदान केलं नाही तर भरभरून मतदान केलं. 2019च्या निवडणुकीत भुजबळ यांना 126237 मते पडली. तर संभाजी पवार यांना 56525 मते पडली. या निवडणुकीत भुजबळ 69712 मतांनी विजयी झाले.

4 वेळा मराठा उमेदवार, विजयी भुजबळ

या चारही निवडणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते. 2004 मध्ये कल्याणराव पाटील भुजबळांविरोधात उभे होते. पाटील हे मराठा होते. 2009मध्ये माणिकराव शिंदे विरोधात लढले. तेही मराठा होते. तर 2014 आणि 2019मध्ये संभाजी पवार भुजबळांविरोधात लढले. पवार हे सुद्धा मराठा होते. त्यामुळे येवल्यात मराठा फॅक्टर चालत नसल्याचं दिसून येत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.