BMC election 2022 Gavdevi Ward 23 : कोण उभारणार भाजपच्या शिवकुमार झा विरोधात

या वेळी परिस्थिती वेगळी होऊ शकते, कारण शिवसेना आणि भाजप युतीमध्ये एकत्र नाहीत, कारण सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या संघर्षामुळे. शिवसेना हा महाराष्ट्राचा सत्ताधारी पक्ष आहे, आणि त्याची NCP आणि INC सोबत युती आहे. परंतु भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 2022 च्या आगामी BMC निवडणुकीसाठी महाविकास आघाडीशीही फारकत घेतली आहे.

BMC election 2022 Gavdevi Ward 23 : कोण उभारणार भाजपच्या शिवकुमार झा विरोधात
प्रभाग 23 गावदेवीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 9:59 PM

BMC election 2022 : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) गेल्या आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेसह (बीएमसी) 14 महापालिकांना 31 मे रोजी ओबीसी जागांशिवाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर मंगळवारपासून महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. तर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले असून, त्यात दोन्ही पक्षांच्या अनेक नेत्यांना मोठा झटका बसला आहे. मात्र काहीही झालं तरी या निवडणूकीत जनता आपल्याच पक्षाला बहुमत देईल आणि आपल्याच पक्षाचा झेंडा हा मुंबई महापालिकेवर लागेल असा दावा शिवसेना आणि भाजपकडून केला जात आहे.

राज्यातील होऊ घातलेल्या बीएमसीसह 14 महापालिकाच्या निवडणूकीवरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. तर भाजपकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलत शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. तर राज्यात सत्तेचा घास काढून घेतल्याने भाजपची ही अवस्था झाल्याचे शिवसेनेकडून बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य काय? कांदिवली वॉर्ड क्रमांक 23 प्रभागातील प्रश्न कोणती आहेत. हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

भाजप नगरसेवक शिवकुमार झा

भाजप नगरसेवक शिवकुमार झा हे 2007 पासून कांदिवली वॉर्ड क्रमांक 23 मधील नागरिकांचे नगरसेवक म्हणून प्रतिवनिधीत्व करत आहेत. तर ते गेल्या 10 ते 12 वर्षांपासून भाजच्या सोबत आपली वाटचाल करत आहेत. तसेच गेल्यानिवडणूकीत विकासासाठी आपल्याला मत द्या असे म्हणत ते मतदारांच्या समोर गेले होते. तर त्यानंतर ते आता बीएमसीतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी भाजपला साथ द्या अशी घोषणा घेऊन लोकांच्या समोर जाणार आहेत. तसेच आपल्या या सत्तेच्या पाच वर्षांत लोकांनी सेवा करण्याची संधी दिली असून ती पुढेही आपल्याला देतील असे त्यांनी एका खाजगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 2007 पासून प्रतिनिधीत्व करत आहेत. येथे एकूण मतदार 48691 असून त्यात अनुसूचित जाती: 1438 ST: 558 आहेत.

हे सुद्धा वाचा

समस्यांचा बालेकिल्ला

तर 2018 मध्ये झा यांनी मतदारांना अनेक आश्वासने दिली होती ती मात्र पुर्ण झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे समस्यांचा बालेकिल्ला म्हणून कांदिवली वॉर्ड क्रमांक २३ कडे पाहिले जातं. येथे मूलभूत सुविधांचा प्रश्न हा वर्षानुवर्षे रखडलेला असल्यानेच या प्रभाग परिसरात ना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ना शाळा. या प्रभागासाठी पुरेशी बससेवाही नव्हती. तर 2018 मध्ये काही प्रमाणात बस सेवा सुरू करण्यात आली होती.

हिंदी भाषिक भाग

कांदिवली वॉर्ड क्रमांक 23 मध्ये बहुतांश अल्प उत्पन्न गटातील मतदार राहतात. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू, कर्नाटक आदींसह इतर हिंदी भाषिक राज्यांतील लोक येथे राहतात. तर मराठी लोकसंख्या कमी आहे. बहुसंख्य हिंदी भाषिक लोकसंख्या असलेला हा भाग आहे. समस्यांचा बालेकिल्ला म्हणून हा प्रभाग लोक ओळखतात. सुमारे 15 वर्षे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्याने ना योग्य रस्ता, ना योग्य गटारे, स्वच्छतागृहे, पाणी आदी सुविधा नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.

नाल्यांचे काम पूर्ण

प्रभागात विविध विकासकामे केली जात आहेत. नाल्यांचे बांधकाम 2018 मध्ये ६५ टक्के पूर्ण झाले होते. तर उर्वरित 35 टक्केही जानेवारी-फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण होईल असे प्रशासनाने म्हटले होते. तर प्रभागात आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतूनही 27 सार्वजनिक शौचालये बांधण्यात येत होती. त्यापैकी 13 चे काम पूर्ण झाले होते. विशेषबाब म्हणजे प्रभागातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

गर्दीचा परिसर

या परिसरात भाजी मंडई, मासळी मार्केट, धान्य मार्केट आदींमुळे नेहमीच वर्दळ असते. सुमारे 80 एकर जागेत झोपड्या बांधल्या आहेत. प्रभागात सर्वत्र घाण पसरली आहे. घाण पाणी आणि कचरा रस्त्यावर पसरला आहे. झोपड्या आहेत, की इथून लोकांना जाणे अवघड झाले आहे. अरुंद गल्ल्यांमुळे एका वेळी एकच व्यक्ती निघू शकते.

माहुल हा एक प्रदूषित परिसर आहे, ज्याला लोक राहण्यायोग्य मानत नाहीत. येथील झोपडपट्ट्यांवर बिल्डरांचा डोळा या झोपडपट्ट्यांवर असल्याचा आरोप होत आहे. या प्रभागात आंबेडकर नगर, एडीसी चाळ, रोहटे चाळ, विश्वकर्मा चाळ, चौहान चाळ, विमलादेवी चाळ, रामनगर, बाबूभाई चाळ, जनभाग्योदय चाळ, जनार्दन पांडे चाळ, गंगुबाई चाळ, इंदिरा चाळ, आदी येतात, जे सुविधांपासून वंचित आहेत.

शिवसेनेने नेहमीच सत्ता गाजवली

बीएमसी निवडणुका हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख भाग राहिला आहे. मागील बीएमसी निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि भाजप हे नेहमीच सर्वात मोठे पक्ष म्हणून समोर आले आहेत. शिवसेनेने बीएमसी निवडणुकीत नेहमीच सत्ता गाजवली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून पहिले स्थान मिळवले आहे. 2012 च्या बीएमसी निवडणुकीत सेनेने 75 जागा जिंकल्या, 2017 मध्ये, पक्षाला 84 जागा मिळाल्यामुळे संख्या आणखी मोठी झाली. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत, भाजपने 82 जागांसह दुसरे स्थान मिळवले आणि दोन्ही पक्ष युती असल्याने, विजय मोठा होता.

मात्र या वेळी परिस्थिती वेगळी होऊ शकते, कारण शिवसेना आणि भाजप युतीमध्ये एकत्र नाहीत, कारण सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या संघर्षामुळे. शिवसेना हा महाराष्ट्राचा सत्ताधारी पक्ष आहे, आणि त्याची NCP आणि INC सोबत युती आहे. परंतु भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 2022 च्या आगामी BMC निवडणुकीसाठी महाविकास आघाडीशीही फारकत घेतली आहे.

2017 मतदार

बीएमसी निवडणुकीसाठी नोंदणीकृत मतदार 2017 = 91.8 लाख, बीएमसी निवडणूक 2017 दरम्यान टाकलेली मते = 51.04 लाख होती तर बीएमसी निवडणुकीसाठी 2017 = 55.5% मतदार होती तर मुंबई बीएमसी निवडणूक 2017 दरम्यान प्रमुख शिवसेना 28.32% टक्के मतदान झाले होते. त्यांना 1443969 मते मिळाली होती. तसेच भाजप 27.32% टक्के मतदान झाले होते. त्यांना 1392676 मते मिळाली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.