प्रतापराव जाधवांना डच्चू ? बुलढाण्यातून लढण्याबाबत संजय गायकवाड यांचं मोठं विधान

बुलढाण्याच्या लोकसभेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात स्पर्धा आणि रस्सीखेच सुरु आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे संसदे सोबतचे छायाचित्र व्हायरल केल्याने या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपात स्पर्धा सुरु झाली आहे.

प्रतापराव जाधवांना डच्चू ? बुलढाण्यातून लढण्याबाबत संजय गायकवाड यांचं मोठं विधान
sanjay gaikwadImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 7:49 PM

गणेश सोळंकी, बुलढाणा | 11 नोव्हेंबर 2023 :  बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची संसदेसोबतची छायाचित्रे तयार करुन सोशल मिडीयात व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणूकीत डच्चू देणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे बुलढाण्यातून लोकसभा लढविण्याबाबत शिंदे गट आणि भाजपामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बुलढाण्याच्या सर्वेक्षणात खासदार प्रतापराव जाधव चौथ्या नंबरला ढकलले गेल्याने शिवसेनेची जागा जाऊ नये म्हणून आपण लोकसभेवर जाण्यास तयार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

13 व्या लोकसभेचा सर्वे भाजपाने केला आहे. त्यात बुलढाण्याची जागा चार नंबरला दाखविली आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नसल्याने ही जागा शिंदे गटाकडून भाजपाला देण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून होत आहे. परंतू शिवसेना एकनाथ शिंदे गट आपली जागा सोडायला तयार नसल्याने या जागेसाठी सेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा लागला आहे. आम्ही शिवसेनेची जागा भाजपाला द्यायला तयार नाही, आम्ही शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना निवडून आणू असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जर भाजपाच्या म्हणण्याप्रमाणे जाधव निवडून येत नसतील तर लोकसभेसाठी आपण पण तयार आहोत. आमचा पण सर्वे करा. मग समजेल शिवसेना कुठे आणि भाजपा कुठे आहे ? आपण लोकसभा लढवायला तयार नाही.पण अटीतटीची वेळ आली तर आणि खासदार जाधव लढवायला तयार नसतील तर शिवसेनेची जागा राखण्यासाठी आपण तयार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

पोस्टर्स व्हायरल झाल्याने खळबळ

बुलढाण्याच्या लोकसभेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा गटात स्पर्धा आणि रस्सीखेच सुरु आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे संसदेचे छायाचित्र आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार संजय गायकवाड लोकसभा लढवायला तयार आहे अशा आशयाचे पोस्टर्स समाजमाध्यमातून व्हायरल केले आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये बुलढाण्याच्या जागेवरुण ठिणगी पडलेली असल्याचे म्हटले जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.