मुंबईत आणखीन वंदेभारत दाखल होणार ? देखभाल दुरूस्तीसाठी येथे होणार चोख व्यवस्था
सीएसएमटी येथून अलिकडेच साई शिर्डी नगर आणि सोलापूर या दोन वंदेभारत सुरू झाल्या आहेत. तर सीएसएमटी - मडगाव वंदेभारत लवकरच सुरु होणार आहे. आता सीएसएमटीतून राज्यातून आणि देशातील या महानगरातून वंदेभारत दाखल होणार आहेत.
मुंबई : आगामी काळात देशातील अनेक राज्यात निवडणूका आहेत. त्यामुळे निवडणूका असलेल्या राज्यातून नव्या वंदेभारत ( Vande Bharat Express ) मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे या वंदेभारतच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी चोख व्यवस्था सरकारने केली आहे. त्यासाठी मुंबईत दोन ठिकाणी वंदेभारतच्या मेन्टेनन्स डेपोची ( Maintenance Depot ) उभारणीचे काम वेगाने होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ( Jogeshwari ) आणि सीएसएमटी ( CSMT ) येथे वंदेभारतच्या मेन्टेनन्स डेपोंची उभारणी होत आहे. नजिकच्या काळात आणखी काही महानगरांतून वंदेभारत मुंबईत येणार असल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
वंदेभारत ही नव्या युगाची वेगवान, आरामदायी आलीशान ट्रेन प्रवाशांना आवडली आहे. या ट्रेनचे तिकीटदर जादा असल्याने त्यांना धार्मिक तसेच इतर पर्यटनासाठी वापरले जात आहे. मूळ सोळा डब्यांच्या या ट्रेनचा ऑपरेटींग खर्च जास्त असल्याने जेथे प्रवासी नाहीत तेथे ही ट्रेन रेल्वेसाठी महागडा व्यवहार ठरत आहे. त्यामुळे या ट्रेनची आठ डब्यांची छोटी आवृत्ती अशा जागी चालविण्यात येत आहे. नुकतिच नागपूर ते बिलासपूर मार्गावर सोळा डब्यांच्या ऐवजी आठ डब्याची वंदेभारत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर, जालना वंदेभारत धावणार ?
देशातील 19 व्या वंदेभारतची घोषणा मडगाव ते मुंबई सीएसएमटी मार्गावर करण्यात आली होती. या ट्रेनचे उद्घाटन 3 जून रोजी होणार होते. परंतू आदल्या दिवशीच बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाल्याने या ट्रेनचे प्रस्तावित उद्घाटन पुढे ढकल्यात आले आहे. आता बालासोर अपघाताची सीबीआय चौकशी सुरू करण्यात येत आहे. आता मुंबईत कोल्हापूर, जालना तसेच राज्यातील आणि देशातील अन्य मेट्रो शहरातून वंदेभारत दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई ते मडगांव ( गोवा ) वंदेभारत केव्हा
सीएसएमटी येथून अलिकडेच साई शिर्डी नगर आणि सोलापूर या दोन वंदेभारत सुरू करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी – मडगाव वंदेभारत लवकरच सुरु होणार आहे. सीएसएमटीतून राज्यातून आणि देशातील महानगरातून वंदेभारत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएसएमटीतील वाडीबंदर यार्डात वंदेभारतच्या मेन्टेनन्ससाठी आठ मेन्टेनन्स लाईन तयार करण्यासाठी लवकरच टेंडर मागविण्यात येणार आहे. 1882 मध्ये उभारलेले हे ब्रिटीशकालीन यार्डात पारंपारिक मेल एक्सप्रेसच्या मेन्टेनन्ससाठी आठ लाईन आहेत. आता वंदेभारतच्या मेन्टेनन्ससाठी आणखी आठ लाईन बांधण्यात येणार आहेत. या लाईनवर नव्या वंदेभारतचे मेन्टेनन्स करण्यात येणार आहे.