बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरे भाजपच्या प्रचाराला जाणार ?; प्रकाश महाजन यांचा दावा काय ?

राज ठाकरे यांनी भाजला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केलं आहे. काहींच्या भूमिका सतत बदलत असतात. मात्र आमची हिंदुत्वाची आणि महाराष्ट्रासाठीची भूमिका कधीही कधीच बदलली नाही. फायद्यासाठी राज ठाकरे कोणाशी नाते जोडत नाही. अपेक्षा कोणतीही ठेवली नाही. आम्ही सगळे त्यामुळे तणावमुक्त आहोत, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय.

बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरे भाजपच्या प्रचाराला जाणार ?; प्रकाश महाजन यांचा दावा काय ?
बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरे भाजपच्या प्रचाराला जाणार ?
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 2:37 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मनसेत नाराजीनाट्य सुरू झालं आहे. काही पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात राजीनामे दिले आहेत. मात्र असं असलं तरी राज ठाकरे भाजपच्या प्रचाराला जाणार की नाही? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबतचं विधान केलं आहे. राज ठाकरे याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचं प्रकाश महाजन यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. राज ठाकरे यांचा निर्णय विचारपूर्वक आहे. हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या देशाचं हित महत्त्वाचं आहे. हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाळ जोडली गेली आहे. 370 कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी मोठा मोर्चा काढला होता. राम मंदिर झाले हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेत भारत पुढे आहे. हा सगळा विचार करून राज यांनी भाजपला पाठिंबा दिला, असं सांगतानाच प्रचाराला जायचं की नाही त्याचा निर्णय अद्यापही नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील. येत्या 13 एप्रिल रोजी राज ठाकरे बैठक घेणार आहेत. त्यात निर्णय जाहीर केला जाईल, असं प्रकाश महाजन म्हणाले.

ते महत्त्वाचे नाहीत

मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज होऊन राजीनामे दिले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करणार ? मतं वेगळी असली तरी पक्षाच नातं तोडण्यापर्यंत असावं असं मला वाटतं नाही. राजीनामे दिलेले कार्यकर्ते काय महत्त्वाचे लोक नाहीत, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

सगळीकडेच सुरू आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचा उमेदवार बदलला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचा उमेदवार बदलला, त्यावर तुम्ही त्यांना हा सवाल विचारला का ? सगळीकडेच हे सुरू आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गुजराती आणि मराठी हा वाद नेहमीचाच आहे. प्रत्येक राज्याला आपले हित बघायचे असते. आपल्या राज्यात उद्योग येणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी राजकीय वाद करण्याची गरज नाही. राज साहेब कुठे गेले याची चिंता बाकीचे का करतात? कर्णाची कवचकुंडले मागायला इंद्र येणार ते त्यांना माहिती होतं. मात्र काही लोकांनी शाल पांघरून हिंदुत्वाचे ढोंग घेतले आहे, असा टोला महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.