श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट…

शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट...
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 5:16 PM

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांचं मुळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या दरेगाव इथे आहेत. एकनाथ शिंदे हे दरेगावला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गावी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे. तसेच श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार अशी देखील चर्चा आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

सत्ता स्थापन होत असताना मी गावाला जायचं नाही का? असा काही नियम आहे का?  मी नेहमी गावी येतो. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे मला इथे आल्यानंतर आपली माणसं भेटतात त्यामुळे एक वेगळा आनंद होतो, अशी प्रतिक्रिया यावर एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे, यावर देखील शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत आपण पत्रकारच चर्चा करत आहात. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित भाई यांच्यासोबत झाली आहे, दुसरी बैठक आमची तिघांची होईल.  त्यामधून योग्य तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा होईल असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, ही निवडणूक महायुतीने प्रचंड मताने जिंकली. जनतेच्या मनातील सरकार आता स्थापन होईल. गेल्या अडीच वर्षांची आमच्या विकास कामाची ही पोच पावती आहे . जे प्रकल्प मागील अडीच वर्षांपूर्वी थांबवले होते, ते वेगाने सुरू केले आहेत. यापूर्वीच्या सरकारने जेवढ्या योजना राबवल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राज्यात सुरू केल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील,  मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही संभ्रम नको म्हणून मी मागच्याच आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.