कोरोनाची खबरदारी घेऊन हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, भाजप आमदारांची मागणी

आता या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. (Winter session should be held in Nagpur Demand from BJP MLA)

कोरोनाची खबरदारी घेऊन हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, भाजप आमदारांची मागणी
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 8:32 AM

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी केली आहे. त्यामुळे आता या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. (Winter session should be held in Nagpur Demand from BJP MLA)

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. तर काही कार्यक्रम हे ऑनलाईन पार पडत आहे. येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र कोरोनामुळे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी हे अधिवेशन नागपुरात घेऊ नये, अशी मागणी केली होती. या मागणीला भाजप आमदारांनी विरोध दर्शवला आहे.

नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घ्या, अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे. नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे, समीर मेघे, मोहन मते, प्रविण दटके यांनी याबाबतची मागणी केली आहे. कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊन हे अधिवेशन नागपुरात घ्यावं, असेही भाजप आमदार म्हणाले. तसेच मुंबईत अधिवेशन घेण्याच्या हालचालीमुळे हे सर्व भाजप आमदार नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान नागपुरात सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पण कोरोनामुळे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पण सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी अधिवेशनासाठी आमदार निवासात रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला होता. यंदाही यासाठी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. संच अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे.  मात्र हिवाळी अधिवेशन नेमकं कुठे होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.  (Winter session should be held in Nagpur Demand from BJP MLA)

संबंधित बातम्या : 

नागपूर अधिवेशनासाठी आमदार निवासात डागडुजी, कोरोना संकटात सरकारची आर्थिक उधळपट्टी?

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय, निगेटिव्ह प्रेशर रुम म्हणजे काय?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.