कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र

सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राष्ट्रपतींना पत्र लिहून केली आहे.

कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र
कंगना राणावत
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 6:46 PM

नाशिकः सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने ‘1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले,’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केला. त्यामुळे तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे 8 नोव्हेंबर 2021 रोजी कंगना राणावत यांचा आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कला क्षेत्र वगळता श्रीमती कंगना राणावत या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात. याच कारणाने प्रसिद्ध सोशल मीडिया अॅप ट्विटरने श्रीमती कंगना राणावत यांचे अकाऊंट बंद केले होते, असा उल्लेखही या पत्रात आहे. मात्र, आता पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर श्रीमती कंगना राणावत यांचे पाय जमिनीवर नाहीत. सध्या त्या हवेत आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताचा अवमान केल्याचे पत्रात म्हटले आहे. कंगना म्हणाल्या की, ‘1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे. त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे श्रीमती कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे. त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी त्यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. त्यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आम्ही राष्ट्रपती महोदयांकडे पत्र लिहून केली आहे. – अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

(Withdraw Padma Shri award given to actress Kangana Ranaut; Demand of NCP Youth Congress in Nashik, letter written directly to the President)

इतर बातम्याः

एसटी संपाला नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, भाजप, मनसेचा पाठिंबा; प्रवाशांची कोंडी

प्रख्यात हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर दसककर यांचे नाशिकमध्ये निधन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.