नोकरीवरून काढल्याच्या तणावात अंगणवाडी सेविकेचा मृत्यू, लोकलमध्येच घेतला अखेरचा श्वास

अचानक नोकरी गेल्याच्या तणावात कोकण भवनमधून परत येत असताना अंगणवाडी सेविकेचा लोकलमध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कारण न सांगता अचानक कामावर काढल्याने मानसिक धक्का बसल्याने मुर्त्यू झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मुलाने केली मागणी मागणी केली आहे.

नोकरीवरून काढल्याच्या तणावात अंगणवाडी सेविकेचा मृत्यू, लोकलमध्येच घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 1:39 PM

नोकरीवरून काढण्यात आल्याची बातमी अतिशय धक्कादायक असते. पण त्या धक्क्क्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. अशीच एक दुर्दैवी आणि तेवढीच धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले, अन् मानसिक धक्का बसून एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोकलमध्ये असतानाच ती महिला खाली कोसळली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. मात्र् आईच्या अक्समात मृत्यूमुळे कुटुंबियांना आणि मुलाला मोठा धक्का बसला असून आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या मुलाने केली आहे.जयश्री कडाली असे या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. त्या मुरबाडमधील चैत्यपाडा अंगणवाडीत सेविका होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री या मुरबाडमधील चैत्यपाडा अंगणवाडीत सेविका होत्या. 30 जुलै रोजी त्यांना सेवासमाप्तीची नोटीस देत, त्यांचे काम थांबवण्यात आले. मात्र, आपल्याला अचानक कामावरून का काढले?, याचे कारण विचारूनही ते न देता, नोटीस स्वीकारल्याबद्दल सही करण्यासाठी त्यांना बेलापूरमधील कोकण भवन कार्यालयात बोलावण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून जबरदस्तीने सही घेण्यात आल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.

लोकलमध्येच मृत्यू

कोणतेही कारण देण्यात आले नसल्याने आपल्याला हे काम करू देण्याची मागणी जयश्री यांनी केली होती. यानंतर त्यांना वरिष्ठांकडून ऑर्डर घेऊन येण्यास सांगण्यात आले. मात्र, कोकण भवनमध्ये त्यांना नंतर या, आम्ही पत्राने कळवू यांसारखी कारणे देत, परत पाठवण्यात आले. घरी परत जात असताना त्या प्रचंड तणावाखाली होत्या. अचानक नोकरी गेल्याने हतबल झालेल्या जयश्री यांची मुलाच्या मदतीने धडपड सुरू होती. बुधवारी २८ ऑगस्टला त्या सकाळीच कोकण भवनला गेल्या.

मात्र, दुपारपर्यंत त्यांना थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्यांना पत्राने उत्तर देतो, असे सांगत परत पाठवण्यात आले. जयश्री आपल्या मुलाबरोबर ठाणे ते बदलापूर लोकल प्रवास करत असताना, खूपच तणावाखाली होत्या. अशातच कोपर ते डोंबिवलीदरम्यान त्यांचे लोकलमध्येच निधन झाले. रेल्वे पोलिसांनी त्यांचा मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयश्री यांच्या मुलाने केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.