धक्कादायक, रेल्वेचा पहिला डबा अंगावरून गेला, महिलेचे दोन्ही पाय गेले; बेलापुरातील धक्कादायक घटना
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं असून लोकलसेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरून पायी चालण्याचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. त्यादरम्यान नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका महिला रेल्वे ट्रॅकवरून जाताना पाय घसरून पडली आणि रेल्वेचा पहिला डबा तिच्या अंगावरून गेला.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं असून लोकलसेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरून पायी चालण्याचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. त्यादरम्यान नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका महिला गर्दीमुळे रेल्वे ट्रॅकवर पडली आणि रेल्वेचा पहिला डबा तिच्या अंगावरून गेला. यामुळे एकच गोंधळ माजला. या दुर्दैवी घटनेत महिलेला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत झाली आहे. चुनाभट्टी स्थानकावर प्रचंड पाणी साचल्याने मानखुर्द ते वडाळ्या दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हार्बर मार्गावर सर्वच स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याच वेळी ही महिला आज सकाळी १० च्या सुमारास बेलापूर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन पकडण्यासाठी गेली. मात्र बेलापूर ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे तिचा पाय घसरला आणि लोकलखाली पडली. तेवढ्यात ट्रेन सुरू झाली आणि तिच्या अंगावरून गेली आणि तिचे दोन्ही पाय कापले गेले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली आणि काही वेळातच गाडी हटवून त्या महिलेचे प्राण वाचवले. मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाहीत. त्या महिलेवर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मोठी घबराट निर्माण झाली असून प्रवाशांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
हार्बर सेवा ठप्पा
पावसामुळे हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत झाली आहे. सध्या पनवेल ते वाशी मार्ग सुरु आहे. तर वाशीपासून सीएसएमटीला येणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईला येण्यासाठी वाशी ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असा लोकांचा प्रवास सुरु आहे. चुनाभट्टी स्थानकात पाणी अजूनही असल्याने सीएसएमटी ते वाशी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर ट्रान्स हार्बर लाईन पंधरा मिनिटे उशिराने सुरु आहे. दरम्यान चुनाभट्टी रेल्वे रुळावरील पाणी पंप्पाच्या साह्याने बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.