साहेब, जगायला पैसे लागतात, मरायला नाही, अधिकाऱ्यासमोरच महिलेचे हातावर ब्लेडने सपासप वार; बुलढाण्यात असं काय घडलं ?

आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा पगार थकवल्यामुळे त्याच्या पत्नीने एक धक्कादायक पाऊल उचललं. तिने डिएचओंच्या (जिल्हा आरोग्य अधिकारी) केबीनमध्ये जाऊन स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय खळबळजनक घटना बुलडाण्यामध्ये घडली आहे.

साहेब, जगायला पैसे लागतात, मरायला नाही, अधिकाऱ्यासमोरच महिलेचे हातावर ब्लेडने सपासप वार; बुलढाण्यात असं काय घडलं ?
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 12:32 PM

आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा पगार थकवल्यामुळे त्याच्या पत्नीने एक धक्कादायक पाऊल उचललं. तिने डिएचओंच्या (जिल्हा आरोग्य अधिकारी) केबीनमध्ये जाऊन स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय खळबळजनक घटना बुलडाण्यामध्ये घडली आहे. आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा पगार थकवल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून सर्वत्र याच कृत्याची चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनिता ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारून घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. दरम्यान प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी या महिलेला ठाण्यात आणून कलम 149 नुसार नोटीस दिली.

‘पोट भरायला पैसा लागतो साहेब, मरायला लागत नाही’

वनिता यांचे पती ज्ञानेश्वर खंडारे हे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. मागील सहा महिन्यांपासून त्यांचा पगार प्रलंबित असून आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्वर खंडारे याची 2016 पासून काही प्रकरणांमध्ये चौकशी सुरु आहे. त्याशिवाय इतर काही तक्रारीही खंडारे यांच्या विरोधात होत्या. त्यात ते प्रथमदृष्ट्या दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मात्र सहा महिन्यांपासून पगार थांबविल्यामुळे घरात पैसाच नाही, त्यामुळे खंडारे परिवाराची आर्थिक परिस्थिती नाजूक झालीय . परिवाराचा उदरनिर्वाह करणे त्यांना कठीण झाले असून मुलांचे शिक्षण कसे करायचे, त्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे. त्यामुळे हताश झालेल्या खंदारे यांच्या पत्नीने, वनिता या न्याय मागण्यासाठी थेट जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे गेल्या, मात्र तिथेही त्यांना न्याय मिळला नाही, उलट त्यांनी आपल्याला उर्मट भाषेत उत्तर दिले. त्यामपळे आपण हातावर ब्लेड मारून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, असे वनिता यांनी सांगितले. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून त्यांनी वनिता यांना नोटीस बजावली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.