Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारु खरेदीतही ‘लेडीज फर्स्ट’, भिवंडीत वाईन शॉपबाहेर तळीरामांकडून बायकोला रांगेत उभं करण्याचे प्रकार

काही तळीरामांनी आपल्या बायकांनाच वाईन शॉपबाहेरील रांगांमध्ये उभं केल्याचे प्रकार भिवंडीत समोर आले आहेत (Womens are in queue for alcohol in Bhivandi).

दारु खरेदीतही 'लेडीज फर्स्ट', भिवंडीत वाईन शॉपबाहेर तळीरामांकडून बायकोला रांगेत उभं करण्याचे प्रकार
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 7:19 PM

ठाणे : सार्वजनिक ठिकाणी आणि इतर कार्यक्रमांमध्ये स्त्री दाक्षिण्याचा भाग म्हणून महिलांना प्राधान्य देण्याची प्रथा आहे. याच प्रथेप्रमाणे आता लॉकडाऊनच्या काळात मद्य खरेदीसाठी होत असलेल्या रांगांमध्येही महिलांना प्राधान्य मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हेच लक्षात घेऊन आता काही तळीरामांनी आपल्या बायकांनाच वाईन शॉपबाहेरील रांगांमध्ये उभं केल्याचे प्रकार भिवंडीत समोर आले आहेत (Womens are in queue for alcohol in Bhivandi). नवऱ्याच्या व्यसनासाठी महिलांनाचा दारुच्या रांगेत उभं राहण्याची वेळ आल्यानं भिवंडीत या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता वाईन शॉप मालकांकडून दारु खरेदीसाठी तळीरामांकडून या क्लुप्त्यांवर काही प्रतिक्रिया येते का हेही पाहावं लागणार आहे.

अनेक ठिकाणी वाईन शॉपच्या बाहेर दारु खरेदीसाठी पुरुषांच्या गर्दीत काही महिलाही दिसत होत्या. त्यामुळे दारु विक्रेत्यांकडून महिलांना अधिक काळ रांगेत उभं करण्याऐवजी पुरुषांच्या आधी महिलांना प्राधान्य दिलं जात होतं. मात्र रांगेत असलेल्या महिलांना प्राधान्य देण्याच्या प्रकाराचा तळीरामांकडून गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये सध्या हाच चर्चेचा विषय बनला आहे. भिवंडीत ‘लेडीज फस्ट’ प्रमाणे मिळत असलेलं प्राधान्य लक्षात घेऊन अनेक वाईन शॉपच्या बाहेर दारु खरेदीसाठी महिलांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.

लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक चक्राला ब्रेक लागला होता. सरकारच्या कर उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने दारु विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अखेर राज्यातील तळीरामांचा घसा ओला करण्यासाठी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर तिसऱ्या टप्प्यात वाईन शॉपचे शटर उघडले. मात्र, वाईन शॉपचे शटर उघडण्याआधीच तळीरामांनी दारु खरेदीसाठी झुंबड उडवली. बहुतांश वाईन शॉपबाहेर फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही काळ वाईन शॉपचे शटर डाऊनही करण्यात आले. मात्र, पुन्हा दारु विक्री सुरु झाली. राज्य सरकारने काही अटी व शर्थींसह पुन्हा वाईन शॉप उघडण्याची परवानगी दिली.

यानंतर भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे लेडीज फस्ट या प्रथेप्रमाणे वाईन शॉपबाहेर चक्क महिलांनी रांगेत उभे राहून दारु खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. असंच चित्र तालुक्यातील इतर दुकानांवरही दिसत आहे. वाईन शॉपबाहेरील रांगेतील महिलांशी बोलल्यानंतर त्यांना त्यांच्या पतीने रांगेत उभं केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्यसनाधीन पुरुषांनी अखेर दारुबंदीची मागणी करणाऱ्या महिलांनाच आपल्या व्यसनासाठी दारुच्या रांगेत उभं केल्याची चर्चा भिवंडीत सुरु आहे. असताना बऱ्याच वेळा दारुबंदीसाठी महिला ठिकठिकाणी पुढाकार घेऊन “बाटली आडवी ” आंदोलन करीत असताना महिलांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने काही तळीराम पतींनी आपल्या सौभाग्यवतीस रांगेत उभे केले असल्याचे या महिलांशी बोलल्या वर समजले.

संबंधित बातम्या :

आधुनिक श्रावणबाळ! 80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मुलुंड ते वाशिम 350 किमी प्रवास

परप्रांतियांचे परतण्यासाठी लोंढे, कसारा घाट हाऊसफुल्ल, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सांगलीत परप्रांतियांचा हैदोस, सिगरेट न दिल्याने दुकानदाराची स्विफ्ट पेटवली, दुकानाची तोडफोड

Womens are in queue for alcohol in Bhivandi

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.