Kolhapur Flood | अंत्यसंस्काराला जागा नाही, वृत्तपत्र छापायला वीज नाही, कोल्हापूरच्या पूरस्थितीचे थरकाप उडवणारे 7 मुद्दे

अनेक भागात लाईट नाही, इंटरनेट बंद आहे. बऱ्याच गावात मोबाईल फोन लागत नाहीत. ज्यांना नेटवर्क मिळतं त्यांचे फोन चार्जिंगविना बंद आहेत. एकमेकांच्या नातेवाईकांशी संपर्क होत नाही.

Kolhapur Flood | अंत्यसंस्काराला जागा नाही, वृत्तपत्र छापायला वीज नाही, कोल्हापूरच्या पूरस्थितीचे थरकाप उडवणारे 7 मुद्दे
Follow us
| Updated on: Aug 08, 2019 | 11:49 AM

Kolhapur Flood कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये न भूतो इतका महापूर आला आहे. पुराने अक्षरश: जगणं मुश्किल केलं आहे. हा महापूर अनेकांच्या जीवावर उठला आहे. पुराची भीषणता इतकी आहे की माणसं मेली तरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न आहे. स्मशानभूमी आठवडाभर पाण्याखाली आहे, त्यामुळे तिथे पोहोचणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे आठवडाभरात नैसर्गिक मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार झाले कुठे, हा प्रश्न आहे.

अनेक भागात लाईट नाही, इंटरनेट बंद आहे. बऱ्याच गावात मोबाईल फोन लागत नाहीत. ज्यांना नेटवर्क मिळतं त्यांचे फोन चार्जिंगविना बंद आहेत. एकमेकांच्या नातेवाईकांशी संपर्क होत नाही.

महत्त्वाच्या वृत्तपत्रांचं अंकच छापला नाही

कोल्हापुरातील महत्त्वाचं वृत्तपत्र असलेल्या पुढारी, सकाळ आणि तरुण भारत या दैनिकांनाही पुराचा फटका बसला. पुराने वीज आणि इंटरनेट नाही, जनरेट बंद झाला त्यामुळे बुधवारी पुढारी या दैनिकाचा अंकच छापला नाही. तर आज पुढारीने अत्यंत कमी प्रती छापल्या आहेत.

ग्रामीण भागात वीज आणि पाणी सर्वच गायब आहे. भुदरगड, राधानगरी यासारख्या तालुक्यातील अवस्था अत्यंत भयभीत करणारी आहे. पावासाचा मारा इतका मोठा आहे की सई टोचल्याचा भास होत असल्याचं इथले नागरिक सांगतात. शिवाय ग्रामीण भागात दिवसा अंधार अशी स्थिती आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग चार दिवसांपासून ठप्प आहेत. दूध वाहतूक कोलमडली आहे.  हजारो जनावरे पाण्यातून वाहून गेली आहेत.  पूरग्रस्तांनी स्थलांतर केल्याने चोरीचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.

भाज्यांची आवक थांबली आहे. त्यामुळे दर अव्वाच्या सव्वा, कोथिंबिरीची जुडी 150 रुपयांवर पोहोचली.

कोल्हापुरात भीषण पूरस्थिती

  1. अनेक भागात लाईट नाही, इंटरनेट बंद, फोन लागत नाहीत
  2. पुढारी, सकाळ आणि तरुण भारत वृत्तपत्राचे बुधवारचे अंकच छापले नाहीत
  3. 5 दिवसांपासून पुराचे पाणी भरल्यामुळे शहरात पिण्याचे पाणीच आलं नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा
  4. पंचगंगा स्मशानभूमी अनेक दिवसांपासून पाण्याखाली, त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा मोठा प्रश्न
  5. शहरात जर दिवसा 100 लोकांचा नैसर्गिक मृत्यू होतो असं समजलं, तर गेल्या 4-5 दिवस मृतदेहांवर अंत्यसंस्कार कुठे झाले?
  6. जिथे माणसं जगण्यासाठी-जगवण्यासाठी धडपड सुरु असताना, तिथे जनावरांची अवस्था काय असेल याबाबत कल्पनाच न केलेली बरी
  7. हजारो जनावरं मेली, या मेलेल्या जनावरांचे मृतदेह पाण्यासोबत नदीत वाहून गेले.. तर काही मृतदेह नागरी वस्त्यांमध्ये वाहत आले.

कोल्हापूर सांगलीत महापूर

महापुराने हतबल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा वेढा कायम आहे. रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली होती, पण पहाटेपासूनच धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली. कोल्हापूर आणि सांगलीत अनेक भागात 8 ते 9 फूट इतकं पाणी भरलं आहे.  आर्मी,नेव्ही, कोस्ट गार्ड, एनडीआरएफ, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, विविध संस्थांमार्फत दोन्ही जिल्ह्यात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मात्र जोपर्यंत धरण क्षेत्रातील पाऊस कमी होत नाही, तोपर्यंत पुराचं पाणी कमी होणार नाही. राधानगरी धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी वाढलेलीच आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.