पैलवान सिकंदर शेखनं पंढरपूरातील मैदान मारलं, गावानं मिरवणूक काढत डोक्यावर घेतलं
संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने परिचित झालेला सिकंदर शेख याने नुकतीच भीमा केसरीची गदा जिंकली आहे. त्यानंतर त्याच्या गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केलं आहे.
सोलापूर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये कुस्ती हारलेला सिकंदर शेख याने नुकतंच सोलापूर येथील मैदान मारलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती. सिकंदर शेख हाच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचे बोललं जाऊ लागलं होतं. सोशल मीडियावर देखील सिकंदर शेख यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सिकंदर शेखबद्दल बोललं जाऊ लागलं होतं. त्याच्यावर अन्याय केल्याची भावना संपूर्ण कुस्तीच्या वर्तुळात होऊ लागली होती. त्यामध्ये मोहोळचा पैलवान असलेल्या सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात कुस्ती झाली होती. तेच दोन्हीही पंढरपूर येथील भीमा केसरी स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे हे मैदान कोण मारणार आणि भीमा केसरीची गदा कोण पटकावणार अशी चर्चा होती. तिथंलं मैदान मात्र सिकंदर शेख यानं मारलं आहे. आणि भीमा केसरीची गदा पटकावली आहे.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा पैलवान सिकंदर शेख यांचा मोहळवासी यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे.
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणूक काढून सिकंदर शेखला संपूर्ण सोलापूरकरांनी डोक्यावर घेतलं आहे.
सिकंदरच्या नागरी सत्कारासाठी शेकडो मोहोळकर रस्त्यावर उतरले होते, ओपन जीप मधून सिकंदरची रॅली काढण्यात आली होती.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत आणि सहानुभूती मिळालेला पैलवान सिकंदर शेख याचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या मूळ गावीही त्याचं जोरदार स्वागत केलं जात आहे.