विधानपरिषद निवडणूक : यवतमाळमध्ये तानाजी सावंतांच्या जागी सेनेचा तगडा उमेदवार

यवतमाळममधून महाविकास आघाडीने (Yavatmal vidhan parishad Election) शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant Chaturvedi) यांना उमेदवारी दिली आहे.

विधानपरिषद निवडणूक : यवतमाळमध्ये तानाजी सावंतांच्या जागी सेनेचा तगडा उमेदवार
Follow us
| Updated on: Jan 14, 2020 | 11:34 AM

यवतमाळ : विधानपरिषदेचे दोन सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने या दोन जागांसाठी आता निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसंच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Yavatmal vidhan parishad Election) या दोघांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या जागी बीडमधील राष्ट्रवादीचे नेते संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळममधून महाविकास आघाडीने (Yavatmal vidhan parishad Election) शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant Chaturvedi) यांना उमेदवारी दिली आहे.

यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदचे सदस्य होते. आता ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आता त्यांच्या जागी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

“महाविकास आघाडीकडून आज दुष्यंत चतुर्वेदी उमेदवारी अर्ज भरत आहेत.  शिवसेनाच्या उमेदवरासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही अर्ज भरण्यास उपस्थित राहणार आहेत. यवतमाळ विधानपरिषद निवडणूक आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या कुठल्याही स्थानिक नेत्यांची नाराजी नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत”, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सतिश चतुर्वेदी, काँग्रेस नेते नितीन राऊत, शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड बैठकीत उपस्थित होते.

कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी

  • दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला
  • दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत
  • सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते
  • दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात.
  • वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं.
  •  विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे.

भाजपची तयारी

दरम्यान, भाजपकडून सुमित बाजोरिया अर्ज भरणार आहेत. त्यामुळे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी आता दुष्यंत चतुर्वेदी विरुद्ध सुमित बाजोरिया अशी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार मितेश भांगडीया आणि शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांच्या नावाचीही चर्चा होती. कन्हेरे भाजपच्या गोटात गेल्यास शिवसेनेसाठी हा मोठा फटका असेल अशी चर्चा होती. (Yavatmal Council Election).

यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच चुरस सुरु आहे. भाजपनं शिवसेनेला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल

  • भाजप – 147
  • शिवसेना – 97
  • काँग्रेस – 92
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 51
  • प्रहार – 18
  • इतर –
  • बसपा – 4
  • एमआयएम – 8

संबंधित बातम्या 

यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचा तगडा उमेदवार, शिवसेनेला मोठा फटका?  

विदर्भात काँग्रेसला खिंडार, दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.