Yavatmal Crime : यवतमाळात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर चाकूहल्ला, 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

हल्लेखोर माथेफिरु युवक स्वतःचे नाव राजू अन्सारी सांगत आहेत. त्याच्याजवळ नावाबाबत ठोस पुरावा आढळून आला नाही. शिरपूर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले.

Yavatmal Crime : यवतमाळात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर चाकूहल्ला, 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
यवतमाळात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर चाकूहल्ला
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 8:21 PM

यवतमाळ : वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथे जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेतील शिक्षिकेवर 22 वर्षीय माथेफिरूने चाकू हल्ला चढवला. ही घटना गुरुवारी 18 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. अवघ्या अर्ध्या तासातच आरोपीला शिरपूर पोलिसांनी (Shirpur Police) ताब्यात घेतले आहे. वैशाली चल्लावार (वय 40) असे शिक्षिकेचे नाव आहे. वणी पंचायत समिती (Vani Panchayat Samiti) अंतर्गत येत असलेल्या नायगाव (बु) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. ती आपल्या परिवारासह चंद्रपूरला ये- जा करते. सदर शिक्षिका आपले अध्ययनाचे कार्य पार पाडून शाळा सुटल्यावर आपल्या गावी चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाली होती. नायगाव फाट्यावर ती बस किंवा अन्य प्रवासी वाहनाची वाट पाहत असताना अचानक एका माथेफिरु युवकाने तिच्यावर चाकूने हल्ला चढवला.

हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

यात तिच्या कानाला जखम झाली आहे. ती जखमी झाल्याचे नागरिकांना कळताच तिला घुग्गुस येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हल्लेखोर माथेफिरु युवक स्वतःचे नाव राजू अन्सारी सांगत आहेत. त्याच्याजवळ नावाबाबत ठोस पुरावा आढळून आला नाही. शिरपूर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याने चाकू हल्ला का केला हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रामेश्वर कंदुरे पुढील तपास करत आहे.

हल्ला करण्यामागील कारण काय?

संबंधित शिक्षिका नायगाव जिल्हा परिषद शाळेत आहे. शाळा संपल्यानंतर त्या बसस्थानकावरू घरी परत जात होत्या. तेवढ्यात बावीस वर्षीय युवकानं त्यांच्यावर चाकूहल्ला केला. यात संबंधित शिक्षिक जखमी झाली. त्यांना घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोपी युवकाचं नाव राजू अंसारी असं सांगण्यात येतंय. शिरपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानं चाकूहल्ला का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.