Yavatmal Accident : रस्ता ओलांडत असतेवेळी भरधाव वाहनानं पत्नी-पत्नीला चिरडलं! दोघेही जागीच ठार, भीषण अपघातानंतर रास्तारोको

यवतमाळ तालुक्यातील भारी येथील भितु येलणकर आणि त्याची पत्नी सती येलणकर दोघेही रात्री रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास भारी गावातून जवाहर नगर येथे जात होते. यादरम्यान यवतमाळ-नागपूर-यवतमाळ मार्ग ओलांडताना अशातच भारी समोर भरधाव अज्ञात वाहनाने त्या दोघांना जबर धडक दिली.

Yavatmal Accident : रस्ता ओलांडत असतेवेळी भरधाव वाहनानं पत्नी-पत्नीला चिरडलं! दोघेही जागीच ठार, भीषण अपघातानंतर रास्तारोको
यवतमाळमध्ये भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला उडवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 6:02 AM

यवतमाळ : भरधाव वाहनाने दाम्पत्याला उडवल्याची घटना यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी विमानतळाजवळ घडली आहे. या अपघातात वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन केला. टायरची जाळपोळ करत रस्ता रोखला. यामुळे गेल्या तासभरापासून महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. वाहनांवर गावकऱ्यांनी दगडफेकही केली. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला. सती येलणकर (40) आणि भितु येलणकर (45) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. (A speeding vehicle hit an elderly couple in Yavatmal, both of them died on the spot)

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडवले

यवतमाळ तालुक्यातील भारी येथील भितु येलणकर आणि त्याची पत्नी सती येलणकर दोघेही रात्री रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास भारी गावातून जवाहर नगर येथे जात होते. यादरम्यान यवतमाळ-नागपूर-यवतमाळ मार्ग ओलांडताना अशातच भारी समोर भरधाव अज्ञात वाहनाने त्या दोघांना जबर धडक दिली. या धडकेत दोघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी रस्ता रोको करत जाळपोळ केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, तहसीलदार कुणाल झालटे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तब्बल तीन तास रास्ता रोको

तब्बल तीन तास यवतमाळ कळंब मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको दरम्यान काही वाहनावर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यावेळी संतप्त गावकऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. यावेळी संतप्त गावकरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जमले होते. या प्रकरणाचा पुढील तपास यवतमाळ शहर पोलिस करीत आहेत. (A speeding vehicle hit an elderly couple in Yavatmal, both of them died on the spot)

इतर बातम्या

Nagpur Police Suicide : नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, शिपाई पदावर होते कार्यरत

Ambernath Firing : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, थोडक्यात बचावला

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.