Yavatmal Crime : यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न; एक गंभीर तीन किरकोळ जखमी

भोरे दाम्पत्य जादूटोणा करीत असून त्यामुळे एका विवाहितेला अपत्य झाले नाही असा संशय हल्लेखोरांना होता. एका बुवाबाजी करणाऱ्या भोंदूने गावातील व्यक्ती भानामती करतो असे सांगून त्याचे वर्णन सांगितले. त्यावरून भोरे दाम्पत्यावर संशय घेण्यात आला. त्यातून 3 महिन्यांपासून वाद सुरू होते. अखेर संशय ठेवून या दाम्पत्याला जाळण्याचा अघोरी प्रयत्न झाला.

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न; एक गंभीर तीन किरकोळ जखमी
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 6:19 PM

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पोफाळी अंतर्गत येणाऱ्या या तरोडा गावात माणुसकीला कलंकित करणारी घटना घडली आहे. हे गाव सधन संपन्न असले तरी गावात अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे. त्यामुळेच भानामती, करणी, जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका वृद्ध दाम्पत्या (Elderly Couple)ला मारहाण (Beating) करीत जाळण्या (Burn)चा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनायक भोरे आणि निर्मला भोरे अशी पीडित दाम्पत्याची नावे आहेत. यात विनायक भोरे हे गंभीर आहेत. तर पत्नी, मुलगा, सून किरकोळ जखमी आहेत. भोरे दाम्पत्यावर गावातीलच काही लोकांनी जीवघेणा हल्ला चढविला. या वृद्ध दाम्पत्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्यांचे घर जमावाने पेटवून दिले. दरम्यान कसा बसा जीव वाचवून भोरे दाम्पत्य पळाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Attempt to burn an elderly couple in Yavatmal on suspicion of witchcraft)

भोंदूबाबाच्या सांगण्यावरुन गावकऱ्यांकडून दाम्पत्यावर हल्ला

भोरे दाम्पत्य जादूटोणा करीत असून त्यामुळे एका विवाहितेला अपत्य झाले नाही असा संशय हल्लेखोरांना होता. एका बुवाबाजी करणाऱ्या भोंदूने गावातील व्यक्ती भानामती करतो असे सांगून त्याचे वर्णन सांगितले. त्यावरून भोरे दाम्पत्यावर संशय घेण्यात आला. त्यातून 3 महिन्यांपासून वाद सुरू होते. अखेर संशय ठेवून या दाम्पत्याला जाळण्याचा अघोरी प्रयत्न झाला. यामध्ये विनायक भोरे गंभीर जखमी असून कुटुंबातील अन्य तिघे किरकोळ जखमी आहेत. पत्नी निर्मला भोरे, मुलगा ज्ञानेश्वर विनायक भोरे, सून अश्विनी ज्ञानेश्वर भोरे हे तिघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. प्रगतीशील महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रची ओळख होत असताना अशातच भुरसटलेल्या विचारांनी घडलेल्या घटना महाराष्ट्राची मान खाली घालतात. ग्रामीण महाराष्ट्रमध्ये अजूनही लोकांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचं भूत आहे हे या घटनेवरून दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी जादूटोणाच्या संशयातून झाली होती हत्या

याआधीही अंधश्रद्धेतून एका इसमाची हत्या केल्याची घटना यवतमाळमधील आर्णी मार्गावर घडली होती. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून आर्णी मार्गावरील वाघाडी परिसरातील होमगार्ड समादेशक कार्यालयाच्या परिसरात एका 55 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. लक्ष्मण नसू जाधव असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अवधूत वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून तीन संशयित मारेकर्‍यांना ताब्यात घेतले होते. प्रफुल शेळके, गणेश पवार, अभय नैताम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Attempt to burn an elderly couple in Yavatmal on suspicion of witchcraft)

इतर बातम्या

Parambir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा; 9 मार्चपर्यंत चौकशीला स्थगिती

चोरीच्या आरोपाखाली महिलेला अटक, पण आता मिळणार तब्बल 15 कोटी! कसं-काय बुआ?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.