Video Yavatmal ShivSena : संजय राठोड पाठोपाठ भावना गवळी शिंदे गटात, राजेंद्र गायकवाड म्हणतात, ताईसोबत भाऊ नांदेल काय?
भावना गवळी यांचा गेल्या साडेतीन वर्षांपासून संपर्क नाही. हे दोघेही नेते प्रभावहीन झाले आहेत. त्यामुळं शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
यवतमाळ : जिल्ह्यात शिवसेना मोठं खिंडार पडलं. आधी संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. आता आज भावना गवळीचा गट शिंदे गटात सामील झाला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या बंडानंतर शिवसेनासुद्धा अॅक्शन मोडवर आली आहे. शिवसेनेने जिल्ह्यातील संजय राठोड यांच्या मतदारसंघातील (Constituency) पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत नवीन नेमणुका केल्या आहेत. संजय राठोड यांच्याकडं आलेले कार्यकर्ते हे त्याचे लाभार्थी कार्यकर्ते होते. शिवसैनिक संख्या कमी होती. भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामधील विस्तवही जात नव्हतं. जिल्ह्यातील शिवसैनिक (Shiv Sainik) या दोघांमध्ये भरडला जात होता. आता ताई गट भाऊ गट दोघेही शिंदे गटात गेले. त्यामुळे आता ताई भाऊंसोबत नांदणार का? असा सवाल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांनी केला.
पाहा व्हिडीओ
कार्यकर्त्यांना फोन करून बोलवावे लागले
संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे यांना समर्थन पत्र भरून घेण्यात आले. कार्यकर्त्यांनी समर्थन पत्र भरून दिले. शिवसेनेचे आमदार आणि खासदार व त्यांचे कार्यकर्ते शिंदे गटात गेल्यानं शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड आहेत. राजेंद्र गायकवाड म्हणाले, राठोड यांना कार्यकर्त्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भावना गवळी यांनीही कार्यकर्त्यांना फोन करून बोलावले. शपथपत्र भरून मागण्यात आले. त्यांनासुद्धा प्रतिसाद मिळाला नाही.
दोन्ही नेते प्रभावहीन असल्याचा आरोप
राळेगाव मतदारसंघात दिगंबर मस्के हे उपजिल्हा प्रमुख आहेत. कळंबचे तालुका प्रमुख आहेत. हे सर्व शिवसेनेसोबत ताकदीने उभे आहेत. एका काळात भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात विस्तव जात नव्हता. शिवसैनिक त्यात भरडला जात होता. आम्हाला उत्सुकता आहे की, हे दोघे कसे नांदणार आहेत. राठोड आणि गवळे हे काही मातब्बर राहिलेले नाहीत. याचा प्रभाव पूर्णपणे गेला आहे. संजय राठोड यांना याचा फटका बसणार आहे. भावना गवळी यांचा गेल्या साडेतीन वर्षांपासून संपर्क नाही. हे दोघेही नेते प्रभावहीन झाले आहेत. त्यामुळं शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली.