Yavatmal | पांढरे सोने झाले कोळशाच्या धुळीत काळे! वेकोलीच्या कोळसा खाणीमुळं लोकांचे आयुष्यचं काळवंडले?
यवतमाळ : जिल्ह्याचं प्रमुख पीक कापूस. याला पांढरे सोने असं म्हणतात. पण, वेकोलीच्या कोळसा खाणीमुळं या भागात प्रचंड प्रमाणात धूळ साचते. पांढरे सोने कोळशाच्या धुळीत अक्षरशः काळे होते. याच कोळसा खाणींमुळं नागरिकांचे आयुष्य काळवंडले आहे. ओव्हरलोड ट्रकची धूळ रस्त्यावरून शेतात दीपक मते हे पिंपळगावचे सरपंच. ते सांगतात, पिंपळगाव, जुनाड, कोलार या खाणींचा माल वणीला जातो. […]
यवतमाळ : जिल्ह्याचं प्रमुख पीक कापूस. याला पांढरे सोने असं म्हणतात. पण, वेकोलीच्या कोळसा खाणीमुळं या भागात प्रचंड प्रमाणात धूळ साचते. पांढरे सोने कोळशाच्या धुळीत अक्षरशः काळे होते. याच कोळसा खाणींमुळं नागरिकांचे आयुष्य काळवंडले आहे.
ओव्हरलोड ट्रकची धूळ रस्त्यावरून शेतात
दीपक मते हे पिंपळगावचे सरपंच. ते सांगतात, पिंपळगाव, जुनाड, कोलार या खाणींचा माल वणीला जातो. या मार्गावर कोरला, पिंपरी, ब्राम्हणी, अशी गावे आहेत. या रस्त्यांवर ओव्हरलोड ट्रक चालतात. कोलवॉशरीजमधून ओव्हरलोड ट्रक जातात. या वाहतुकीमुळं रस्त्यावर कोळसा पडतो. त्यावरून गाड्या जातात. या धुळीमुळं गावातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.
लोकं श्वसनाच्या आजाराने त्रस्त
या कोळशाच्या धुळीमुळं श्वसनाचे आजार होत आहेत. शेतीचेही नुकसान होत आहे. कापसाच्या झाडांवर कोळश्याच्या धुळीचे थर साचतात. कापसाचे येणारे पांढरे सोने धुळीनं काळवंडते. कोलमडून जाते. अशाठिकाणी कापूस वेचायला महिला मिळत नाहीत. दुप्पट पैसे देऊनही धुळीतील कापूस वेचायला महिला नकार देतात. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी दीपक मते यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं केली आहे.
पाहुणे अवदसा पाहून निघून जातात
निळापूर येथील युवक सांगतात, कोळसा वॉशरीज आणि धुळीमुळं त्रास होत आहे. यासाठी आम्ही तक्रारी करतो. पण, आमच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. ओव्हरलोड वाहतूक होत असल्यानं रस्त्याची चाळण झाली आहे. कापूस लावल्यानंतर त्याची लागतही निघत नाही, अशी परिस्थिती या धुळीमुळं होते. जनावर धुळीचा चारा खात नाहीत. रात्री ठेवलेल्या पाण्यावर धुळीचे थर साचतात. ते पाणी पिणेही जनावर टाळतात. पाहुणे आले तर ही सारी अवदसा पाहून लगेच काढता पाय घेतात.
सीएसआर फंड कुठे खर्च होतो?
पर्यावरण व मानवी आरोग्याची हानी रोखण्यासाठी वेकोलीच्या सीएसआर फंडातून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकूण उत्पन्नापैकी दोन टक्के सीएसआर फंड परिसरातील पाच किलोमीटर भागात खर्च करायचे असतात. पण, हा फंड कुठे खर्च होतो, हे दिसत नाही.
समस्या संपता संपेना
8-10 दिवसांनी वॉशरीजला पाठविले जाते. पण, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सहानुभुती मिळत नाही. अपघात झाल्यास पोलीस येतात. चौकशी करतात, निघून जातात. पण, समस्या संपता काही संपत नाही, अशी व्यथा येथील युवक बोलून दाखवितात.