Yavatmal Crime | गुप्तधन शोधण्याचे वेड!, यवतमाळात पत्नीच्या नरबळीचा प्रयत्न, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा

ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने कशीबशी वेळ काढून घेतली. ही गंभीर बाब आई-वडिलांना भ्रमणध्वनी वरून सांगितली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी वेळ न लावता थेट केळापूर गाठले. याबाबतची तक्रार पोलिसात दिली.

Yavatmal Crime | गुप्तधन शोधण्याचे वेड!, यवतमाळात पत्नीच्या नरबळीचा प्रयत्न, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा
यवतमाळात नरबळीचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 3:53 PM

यवतमाळ : गुप्तधन शोधण्याच्या मोहापायी पत्नीचा बळी देणार होता. केळापूर येथील संतापजनक घटना आहे. पती व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात 2013 साली जादूटोणा कायदा (Witchcraft Act) लागू झाला. मात्र कायद्याची धाक नसल्याने चिड आणणारे प्रकार घडत आहे. अशाच काही प्रकार यवतमाळच्या पांढरकवडा ( Pandharkavada) जवळ असलेल्या केळापूरमध्ये उघडकीस आला. पतीने पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा पुढे आला आहे. पतीला गुप्तधन शोधण्याचे वेड लागले. अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात त्याने चक्क स्वतःच्या पत्नीवर अनेक मांत्रिक प्रयोग केले. तिला अंगारा लावणे, लिंबू, हार टाकणे, माणसाची कवटी तिच्या गळ्यात टाकणे असे अघोरी प्रकार केले. तसेच जडीबुटीचे (Herbs) औषध देऊन तिला जीवाने मारण्याचा प्रयत्न झाला.

सहाही आरोपी फरार

ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने कशीबशी वेळ काढून घेतली. ही गंभीर बाब आई-वडिलांना भ्रमणध्वनी वरून सांगितली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी वेळ न लावता थेट केळापूर गाठले. याबाबतची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य, प्रतिबंध व निर्मूलन आणि काळा जादू, हुंडाबंदी कायद्या अंतर्गत सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दरम्यान घटनेतील सहा ही आरोपी फरार झाले आहेत. 21 व्या शतकातही गुप्तधनासाठी अघोरी विद्येद्वारे अंधश्रद्धेतून असे प्रकार घडत आहेत. समाजातून अद्यापही अंधश्रद्धेचे भूत उतरलेलं नाही. केळापूर येथे स्वतःच्या पतीने गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.

पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ

विशेष म्हणजे गुप्तधनासाठी सुनेचा नरबळी देण्याचा हट्ट पतीसह सासरच्या मंडळीनी धरला होता. मात्र पीडित महिला याला नकार देत होती. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अशी माहिती पांढरकवडाचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी दिली. दहा वर्षापूर्वी केळापूर येथील प्रवीण गोविंदराव शेगर यांच्यासोबत लग्न झालं. लग्नानंतर एक ते दीड वर्ष पीडितेला सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक देण्यात आली. परंतु, तिला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला.

हे सुद्धा वाचा

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.