दगडाने ठेचून चाकूने भोसकले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, यवतमाळातील थरारक घटना

यवतमाळ जिल्ह्यातील लोहाराच्या एमआयडीसी परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करण्यात आली. दगडाने आणि चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर तरुणाने स्वतःच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दगडाने ठेचून चाकूने भोसकले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, यवतमाळातील थरारक घटना
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 3:39 PM

यवतमाळ : प्रेयसीला प्रियकराने एमआयडीसीतील (MIDC area) जंगल परिसरात नेले. तुझं दुसऱ्या मुलाशी अफेअर आहे. असे म्हणून तिच्या डोक्यावर दगडाचे घाव घालून तिला जीवानिशी ठार केले. तसेच प्रियकराने त्याच परिसरातील रस्त्यावर स्वतःच्या गळ्यावर शस्त्राने वार (stabbed in the neck) करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जखमी प्रियकरला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात (Yavatmal Government Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. गंभीर तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम असं जखमी तरुणाचे नाव आहे.

कशावरून झाला वाद

शुभमचे एका मुलीवर प्रेम होते. पण, दुसऱ्याशी बोलणे त्याला खटकत होते. तुझं माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या मुलाशी अफेअर आहे. असं तो तिला म्हणायचा. पण, तसं काही नाही म्हणून ती विषय थांबवायची. पण, गुरुवारी शुभमच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याने सकाळी दहाच्या सुमारास तिला जंगलात एकांतात नेले. आपण फिरायला जाऊ असं तो म्हणाला. तिही नेहमीप्रमाणे त्याच्यासोबत गेली. पण, शुभमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. तू माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या युवकाशी का बोलते. तुझं त्याच्याशीही अफेअर आहे. अशी शंका उपस्थित केली. तिने नेहमीप्रमाणे विरोध केला. पण, वाद वाढतच गेला.

कशी घडली घटना

शुभमने तिला संपविण्याचा प्लान केला होता. त्यामुळं त्याने सोबत चाकू घेतला होता. त्या चाकूने तिच्या शरीरावर सपासप वार केले. एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही. तर बाजूला असलेले दगड त्याने उचलले. तेही तिच्या शरीरावर आपटले. क्रूरपणे तिला ठेचून मारले. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर त्यानेही स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. पण, यात तो बचावला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आधी रेकी केली नंतर व्यापाऱ्याला लुटले, नागपुरात किराणा दुकानदाराच्या बाबतीत काय घडलं?

महाविकास आघाडी सरकारची ओबीसींसोबत बेइमानी, OBC मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, चंद्रशेखर बावनुकळेंचा हल्लाबोल

2 दिवसांपूर्वी घरून निघाली, नागपूर रेल्वेस्थानकावर सापडली 17 वर्षीय विद्यार्थिनी! घर सोडण्याचे कारण काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.