लग्नसोहळ्यात माणुसकीची भिंत, पुसदमधील आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक

या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र आहे. नवरीच्या वडिलांनी माणुसकीची भिंत जोपासली. त्यामुळे त्यांच्या या लग्नसोहळ्याची चर्चा परिसरात होत आहे.

लग्नसोहळ्यात माणुसकीची भिंत, पुसदमधील आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 5:25 PM

विवेक गावंडे, प्रतिनिधी, यवतमाळ : लग्न म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो. डिजेचा कानठड्या बसवणारा आवाज. घोडा किंवा गाडीवर बसलेला नवरदेव. लाऊडसस्पीकरवरील गाणी, नातेवाईकांचा गोतावळा. पण, या सर्व पारंपरिक विवाह सोहळ्याला काही जण फाटा देतात. असाच एक विवाह सोहळा यवतमाळातील पुसद येथे पार पडला. या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र आहे. नवरीच्या वडिलांनी माणुसकीची भिंत जोपासली. त्यामुळे त्यांच्या या लग्नसोहळ्याची चर्चा परिसरात होत आहे.

निराधारांना अन्नदान आणि वस्त्रदान

एरवी लग्न म्हटले की, आपण डिजे,फटाके आणि इतर वायफळ खर्च पाहत आलेलो आहे. पण पुसद येथील श्रीरामपूर येथे राहत असलेले अनंता चतुर यांनी आपली मुलगी आकांशा हिच्या लग्नात माणुसकीची जाण ठेवली. आहेर पद्धतीला फाटा देऊन पुसदमधील रोडवरील बेघर मनोरुग्ण यांना अन्नदान आणि भोजनदान केले. अत्यंत गरजूंना नवीन कपडे आणि जेवन देऊन समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला.

हे सुद्धा वाचा

लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक

विशेष अनंता चतुर हे गाडगेबाबांच्या कार्यावर प्रेरित झालेत. माणुसकीच्या भिंतीचे ते सदस्य आहेत. माणुसकीची भिंत येथे ते मागील चार वर्षापासून आपली सेवा देत आहेत. दररोज अन्नदान सेवेकरिता न विसरता ते हजर असतात. पुसदमध्ये सध्या या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यांचे कौतुक केले जात आहे. समाजाला अशा विचार करणाऱ्या समाजभान असणाऱ्या माणसांची गरज आहे.

समाजाला दिशा दाखवणारा उपक्रम

या लग्नप्रसंगी या दाम्पत्याने आदर्श ठेवला. मनोरुग्णांना, निराधारांना एकत्र केले. समाजातील काही चालीरीतींना फाटा दिला. निराधारांना अन्नदान, वस्त्रदान केले. अशा आदर्श पद्धतीने विवाह केला. या विवाह सोहळ्यातून आदर्श घ्यावा. समाजाला दिशा दाखवण्याचे काम करावे.

अनंता चतुर यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे ते चांगलेच चर्चेत आले. अन्न आणि वस्त्रदानाची खरी गरज असते ती निराधारांना. हेच अनंता यांनी हेरलं. खर समाधान कुठं मिळेल, तर ते माणुसकीस. ही माणुसकीची भिंत त्यांनी जोपासली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.