Yavatmal Murder : डॉ. हनुमंत धर्मकारे हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक, दहा दिवसांची पोलीस कोठडी

डॉ. धर्मकारे यांची 11 जानेवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमरखेड शहरातील साकळे विद्यालयासमोर ही घटना घडली होती. डॉ. धर्मकारे हे उमरखेड येथील श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होते.

Yavatmal Murder : डॉ. हनुमंत धर्मकारे हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक, दहा दिवसांची पोलीस कोठडी
नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 2:10 AM

यवतमाळ : उमरखेड शहरात भर दिवसा गोळ्या झाडून डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी मध्ये प्रदेशातील धार येथून अटक केली आहे. डॉ. हनुमंत धर्मकारे (Dr. Hanumant Dharmakare) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीला शनिवारी पुसद न्यायालयातील न्यायाधीश व्हि.बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी(Police Custody) सुनावली आहे. अहेफाज अबरार शेख असे मुख्य आरोपीचे नाव आहे. अहेफाज शेख हा पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता. त्याआधी त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु मुख्य आरोपी अहेफाज हा फरार होण्यात यशस्वी झाला होता. परंतु पोलिसांच्या अथक प्रयत्नाने आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Dr. Hanumant Dharmakare main accused arrested, remanded in police custody for 10 days)

डॉ.हेनुमंत धर्मकारे यांची हत्या का करण्यात आली ? त्याचे मुख्य कारण काय होते? हे चौकशीनंतरच कळेल. पोलिसांसमोर पुढील दहा दिवसात मुख्य आरोपींकडून पूर्ण माहिती घेण्याचे व हत्याकांड का घडवले याची माहिती घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एका डॉक्टराची हत्या करण्याचे काय कारण आहे हे आता लवकरच उघड होणार आहे.

11 जानेवारी रोजी गोळ्या झाडून धर्मकारे यांची हत्या

डॉ. धर्मकारे यांची 11 जानेवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमरखेड शहरातील साकळे विद्यालयासमोर ही घटना घडली होती. डॉ. धर्मकारे हे उमरखेड येथील श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होते. रुग्णालयाजवळ असलेल्या गोरखनाथ हॉटेलमध्ये डॉ. धर्मकारे नेहमी मित्रांसोबत चहा पाण्यासाठी भेटत असत. नेहमीप्रमाणे 11 जानेवारी धर्मकारे चहा पान करुन मोटरसायकलवरुन आपल्या खाजगी रुग्णालयात जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला.

रुग्णावर योग्य उपचार झाले नाही म्हणून धर्मकारे यांची हत्या झाल्याची माहिती

डॉ. हनुमंत धर्मकारे हे रुग्णालयात ड्युटीवर असताना एका उमरखेडमधील अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. ही सल मनात ठेऊन त्याचा वचपा काढण्यासाठी डॉक्टरवर गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यातून हे हत्याकांड घडले असल्याची माहिती मिळते. (Dr. Hanumant Dharmakare main accused arrested, remanded in police custody for 10 days)

इतर बातम्या

Supreme Court : कर्जदारांना पुन्हा ‘लोन मोराटोरिअम’?; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात याचिका

Chhattisgad Crime : छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, मोबाईलवरील व्हिडिओ पाहून केले कृत्य

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....