Yavatmal Fighting : आर्णी न्यायालयात दोन वकिलांमध्ये हाणामारी; निवडणुकीचा वाद उफाळला

न्यायालयाच्या आवारात घडलेल्या हाणामारीच्या घटनेने चांगलीच तारांबळ उडाली. न्यायालयातील सर्व वकील मंडळींसह उपस्थित पक्षकारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तुफान हाणामारी सोडवताना पोलिसांचीही मोठी धांदल उडाली. तुफान हाणामारीत एक वकील गंभीर जखमी झाला आहे. त्याला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Yavatmal Fighting : आर्णी न्यायालयात दोन वकिलांमध्ये हाणामारी; निवडणुकीचा वाद उफाळला
आर्णी न्यायालयात दोन वकिलांमध्ये हाणामारी
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 10:27 PM

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी न्यायालयात आज तुफान हाणामारी (Fighting)ची घटना घडली. ही हाणामारी न्यायालयात हजर केलेल्या कुठल्या कैद्यांमध्ये किंवा गुन्हेगारांमध्ये झाली नाही, तर चक्क वकिलां (Advocates)मध्ये झाली. दोन वकील एकमेकांशी भिडले. ही हाणामारी एवढी तीव्र होती कि यात एका वकिलाला गंभीर दुखापत (Injury) झाली आहे. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा जुना वाद उफाळला आणि त्यातूनच ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने न्यायालयासह आर्णी परिसरात खळबळ उडाली आहे.

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून होती धुसफूस

हाणामारी झालेल्या दोन वकिलांमध्ये बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून धुसफूस होती. यातून ते एकमेकांबद्दल प्रचंड द्वेषाची भावना बाळगून होते. याच द्वेषाचा आज आर्णी न्यायालयात उद्रेक झाला. जुन्या वादातून दोघे एकमेकांवर चालून आले आणि त्यांनी परस्परांना जोरदार हाणामारी केली. न्यायालयाच्या आवारात घडलेल्या हाणामारीच्या घटनेने चांगलीच तारांबळ उडाली. न्यायालयातील सर्व वकील मंडळींसह उपस्थित पक्षकारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तुफान हाणामारी सोडवताना पोलिसांचीही मोठी धांदल उडाली. तुफान हाणामारीत एक वकील गंभीर जखमी झाला आहे. त्याला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आधी बाचाबाची, मग तुंबळ हाणामारी!

दिग्रस येथील वकील दुर्गादास राठोड आणि वकील राहुल ढोरे यांच्यामध्ये निवडणुकीपासून असलेल्या जुना वाद अचानक उफाळून आला. त्याच वादातून सुरुवातीला त्यांच्यामध्ये बार रुममधेच बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर अवघ्या काही क्षणांत दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात वकील दुर्गदास राठोड हा गंभीर जखमी आहे. त्याला हाणामारीत गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सुरुवातीला आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीबाबत चिंता वाढल्याने राठोड यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राठोड यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आल्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. (Fighting between two lawyers in Arni court Yavatmal over election dispute)

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.