आधी कॅमेऱ्यावर फवारला काळा स्प्रे नंतर गॅस कटरने फोडले एटीएम! यवतमाळात एकाच रात्री दोन ठिकाणी चोऱ्या
यवतमाळ जिल्ह्यात एकाच रात्री दोन ठिकाणी एटीएम फोडण्यात आले. चोरट्यांनी कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे फवारला. त्यानंतर चोरट्यांनी गॅस कटरने दोन एटीएम फोडले. एटीएममधून वीस लाख रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली.
यवतमाळ : जिल्ह्यातील दोन एटीएम मशीनला टार्गेट करीत एका टोळीने गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले (ATM machine blown up with the help of gas cutter). त्यानंतर लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास केली. यातील एक घटना महागाव तालुक्यातील (Mahagaon taluka) मोठी बाजारपेठ असलेल्या हिवरा संगम येथे घडली तर, दुसरी घटना आर्णी शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शिवनेरी चौकात घडली. आर्णी शहरातील मुख्य मार्गावरील शिवनेरी चौक (at Shivneri Chowk Arni town) येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडले. चोरट्यांनी चक्क 20 लाख 43 हजार 500 रुपयाची रोख लंपास केली. ही घटना रात्री 2.45 वाजताच्या सुमारास घडली. तर त्या चोरट्यांनी एटीएम मशीनचे 2 लाख 45 हजार रुपयाचे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आडे, आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
काही ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही बंद
काही वेळातच डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट एक्स्पर्ट त्या ठिकाणी दाखल झाले.एटीएममधून अशाप्रकारे रोकड लंपास करण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. मोठ्या प्रमाणात रक्कम लंपास झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवनेरी चौकात स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँकेचे एटीएम आणि एक पतसंस्था आहे. परंतु, एकाही बॅंकेकडून सुरक्षात्मक उपाय योजनेवर भर दिलेला पहायला मिळत नाही. या एटीएममध्ये सेक्युरिटी गार्ड तर सोडाच येथील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बंद अवस्थेत आहेत. एकाही बँकेने बाहेर सीसीटीव्ही लावलेले नाही. यवतमाळ जिल्ह्यात एकाच रात्री दोन ठिकाणी एटीएम फोडण्यात आले. चोरट्यांनी कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे फवारला. त्यानंतर चोरट्यांनी गॅस कटरने दोन एटीएम फोडले. एटीएममधून वीस लाख रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. त्यामुळं खळबळ उडाली आहे.