Yavatmal Man Death : यवतमाळमध्ये प्राचार्य पदावरुन निवृत्त पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू

डॉ. रेखा महाजन व त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी विकास महाजन या दोघांच्या हस्ते जिल्ह्यातील पीचएडी प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास महाजन यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शनपर भाषणही केले. भाषणानंतर ते मंचावर बसलेले असतानाच अचानक भोवळ येऊन ते खाली कोसळले.

Yavatmal Man Death : यवतमाळमध्ये प्राचार्य पदावरुन निवृत्त पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू
यवतमाळमध्ये प्राचार्य पदावरुन निवृत्त पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 11:05 PM

यवतमाळ : प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या पत्नी (Wife)चा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात सुरू असतानाच अचानक त्यांच्या पती (Husband)ला भोवळ आली आणि सर्वांच्या डोळ्यादेखत त्यांचे निधन (Death) झाले. शेकडो उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा हा प्रसंग गुरुवारी दुपारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात घडला. विकास महाजन असे मृताचे नाव असून ते आर्णी नाका परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. रेखा महाजन या गेल्या काही वर्षांपासून येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डायट) प्राचार्य होत्या. 31 मार्च रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. (Husband died while send up ceremony of wife in yavatmal)

मंचावर बसले असताना अचानक भोवळ आली

डॉ. रेखा महाजन व त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी विकास महाजन या दोघांच्या हस्ते जिल्ह्यातील पीचएडी प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास महाजन यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शनपर भाषणही केले. भाषणानंतर ते मंचावर बसलेले असतानाच अचानक भोवळ येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी महाजन दाम्पत्याच्या दोन मुली, मुलगा कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे, आजी आजोबांचा सत्कार पाहण्यासाठी त्यांची नातवंडेही आली होती. मात्र सत्काराच्या आनंद सोहळ्यात सर्वांच्या डोळ्यादेखत विकास महाजन यांचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण ‘डायट’ची यंत्रणा आणि महाजन परिवार शोकसागरात बुडाला. (Husband died while send up ceremony of wife in yavatmal)

इतर बातम्या

VIDEO : चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन गाडीखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

पत्नीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्यानं पतीचा डॉक्टरवर प्राणघातक हल्ला! राजगुरुनगरमधील रुग्णालयात नातलगांची तोडफोड

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.