यवतमाळमध्ये जुना वाद उफाळून आला, आरोपींनी विष पाजून तरुणाचा काटा काढला! पाच आरोपी अटकेत

या प्रकरणी अंकुश जाधव याचे वडील विजय जाधव (51) यांनी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार पवन राठोड यांनी कलम 302, 143, 147, 149, 307 नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

यवतमाळमध्ये जुना वाद उफाळून आला, आरोपींनी विष पाजून तरुणाचा काटा काढला! पाच आरोपी अटकेत
यवतमाळमध्ये तरुणाची विष पाजून आत्महत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 4:29 PM

यवतमाळ : जुन्या वादातून एका 28 वर्षीय युवकाला बळजबरीने विष (Poison) पाजून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. अंकुश विजय जाधव (28) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने या पाचही जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. संजय दासु चव्हाण (50), चेतन संजय चव्हाण (25), चिरंजीव संजय चव्हाण (20), रोशन मनोज चव्हाण (22) आणि करण मनोज चव्हाण (20) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. (In Yavatmal, a young man was poisoned to death in an old dispute)

जुन्या वादातून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ तालुक्यातील घाटाणा येथील अंकुश जाधव या युवकासोबत लोणी येथील युवकांचा जुना वाद होता. याच वादातून 22 मार्चला मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास अंकुशला घाटाणा शेतशिवारात संजय चव्हाण, चेतन चव्हाण, चिरंजीव चव्हाण, रोशन चव्हाण आणि करण चव्हाण या पाच जणांनी संगनमत करुन अंकुश याचे हातपाय पकडून त्याला बळजबरीने विष पाजले. याबाबतची माहिती मिळताच कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी धाव घेत अंकुश जाधव याला तातडीने यवतमाळ शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. चिंताजनक प्रकृती असलेल्या अंकुशवर आयसीयु कक्षात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी अंकुश जाधवचा मृत्यू झाला.

आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी

दरम्यान या प्रकरणी अंकुश जाधव याचे वडील विजय जाधव (51) यांनी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार पवन राठोड यांनी कलम 302, 143, 147, 149, 307 नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी विषाची बॉटल व इतर साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल ठाणेदार पवन राठोड, पोलिस उपनिरीक्षक भास्कर दरणे, धनंजय शेकदार, गणेश आगे, निलकमल भोसले, अक्षय डोंगरे, मांगीलाल चव्हाण यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे. (In Yavatmal, a young man was poisoned to death in an old dispute)

इतर बातम्या

Jalgaon Accident | अरुंद रस्त्यावर कारची धडक, दोघा बाईकस्वार तरुणांचा मृत्यू

भुसावळमध्ये लग्नाआधीच मुलीचा हुंड्यासाठी छळ, लग्न मोडण्याची धमकी; अखेर तरुणीने उचलले हे टोकाचे पाऊल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.