Yavatmal Crime : फेक फेसबुक आयडी, जीवे मारण्याची धमकी; बापाकडून पैसे काढण्यासाठी अल्पवयीन मुलाची शक्कल

आर्णी येथील एका व्यावसायिकाला अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करीत त्याला ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. त्या मोबदल्यात एक लाखाची खंडणी मागण्यात आली. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचा मुलगाच फेक आयडी वापरून वडिलांना धमकावत असल्याचे पुढे आले.

Yavatmal Crime : फेक फेसबुक आयडी, जीवे मारण्याची धमकी; बापाकडून पैसे काढण्यासाठी अल्पवयीन मुलाची शक्कल
काटोलमध्ये कुत्र्यांचा पाच वर्षीय मुलावर हल्ला.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:03 PM

यवतमाळ : मोबाईल गेमच्या दुष्परिणामाची आणखी एक घटना उजेडात आली आहे. पबजीमुळे हत्या आणि आत्महत्या सारखे गुन्हे उघडकीस आल्यानंतर आता फ्री फायर गेम (Free Fire Game)चे रिचार्साज करता यावे आणि बाहेरगावी जाता यावे, म्हणून मुलाने स्वतःच्या वडिलांना मुलाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी (Ransom)ची मागणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन आहे. गेमसाठी पैसे मिळतील आणि धमक्यांना घाबरुन सुरक्षेसाठी घरचे बाहेरगावी पाठवतील म्हणून त्याने प्रकार केल्याचे कळते. फेसबुकवर फेक अकाऊंट (Fake Account) बनवून मुलाने बापाला स्वतःलाच जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र हे प्रकरण पोलिसात गेले आणि पोलिस तपासात मुलाचे सर्व बिंग फुटले.

वडिलांकडून पैसे काढण्यासाठी मुलाची नवी शक्कल

आर्णी येथील एका व्यावसायिकाला अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करीत त्याला ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. त्या मोबदल्यात एक लाखाची खंडणी मागण्यात आली. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचा मुलगाच फेक आयडी वापरून वडिलांना धमकावत असल्याचे पुढे आले. शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने वडिलांकडून पैसे काढण्यासाठी नवीनच शक्कल लढवली. त्याने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. दोन्ही फेक आयडींचा वापर करीत वारंवार वडिलांनाच धमक्या देणे सुरू केले. इतकेच नव्हे तर, त्याने मुलाचा खून केला जाईल, त्याच्या पोस्टमार्टमची तयारी ठेवा, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी कलम 384, 506 नुसार गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी यवतमाळ सायबर सेल टीमने अधिक तपास केला आणि या प्रकरणाचा उलगडा केला. खुद्द मुलगाच बापाला धमकावत होता खंडणीचे पैसे घेऊन त्यातून फ्री फायर गेमसाठी रिचार्ज करावे आणि धमकी दिल्याने जीवितास धोका असल्याचे बनाव करत नागपूरला पुढील शिक्षणासाठी जायचे, यासाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज टाकत दहशत तयारी केली. या दहशतीनंतर त्याने तयार केलेला प्लॅन यशस्वी होईल असे वाटले. मात्र पोलिसांनी तत्पूर्वी या प्रकरणाचा शोध लावला.

हे सुद्धा वाचा

मुलांच्या मोबाईल वापराने पालक झाले चिंतित

सायबर सेलच्या माध्यमातून या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. यात धक्कादायक वास्तव पुढे आले. इयत्ता दहावीला असलेल्या मुलानेच वडिलांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. या गंभीर प्रकरणानंतर पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळकरी मुलांमध्ये मोबाईल व समाज माध्यमांची मोठी क्रेझ आहे. प्रत्येक मुलाला मोबाईल लागतोच. त्याचा वापर अशा पद्धतीने होत असेल तर पालकांनी काय करावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. (In Yavatmal the father of a minor boy was threatened with a fake Facebook ID for money)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.