Bhavna Gawli : वर्षभरानंतर खासदार भावना गवळी पोहचल्या मतदारसंघात, पूरबाधित गावांची करणार पाहणी
मी माझ्यावर आलेल्या संकटांचा सामना करत होते. त्यामुळं मला जाहीर कार्यक्रमात जाता आलं नाही. माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून छोटी-मोठी कामं होत होती.
यवतमाळ : अखेर तब्बल एक वर्षांनंतर शिंदे गटाच्या यवतमाळ-वाशिमच्या (Washim-Yavatmal) खासदार भावना गवळी मतदारसंघात दाखल झाल्या. भावना गवळी यांचे बाभूळगाव (Babhulgaon) येथे आगमन झाले. कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. बाभुळगाव येथे आढावा बैठकीनंतर खासदार भावना गवळी पूर बाधित गावांची पाहणी करणार (will inspect) आहेत. सरुळ, वरुड, खर्डा आणि गवंडी भागात नुकसानीची पाहणी करणार आहेत. खासदार भावना गवळी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते एकवटले आहेत. गवळी या यवतमाळमध्ये दाखल झाल्यात. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर भावना गवळी या राजकारणात सक्रिय झाल्यात. मोठ्या प्रमाणावर त्यांचं स्वागत केलं जातंय. भावना गवळी हम तुम्हारे साथ हैंच्या घोषणा वर्षभरानंतर ऐकायला मिळत आहेत.
पाहा व्हिडीओ
23 वर्षांपासून जनतेची सेवा
आपल्या घरातील महिलेवर संकट आल्यास तिला आपण सहकार्य करतो. माझ्यावर संकट आलं तेव्हा मी माझ्या कायदेविषयक बाबींमध्ये व्यस्त होती. गेल्या 23 वर्षांपासून मी या मतदारसंघात सेवा देत आहे. जनतेचा, माझ्या भावांचं, नागरिकांचं प्रेम माझ्यावरती आहे. मी 18-18 तास काम केलं आहे. सतत निवडून येते आहे. मी माझ्यावर आलेल्या संकटांचा सामना करत होते. त्यामुळं मला जाहीर कार्यक्रमात जाता आलं नाही. माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून छोटी-मोठी कामं होत होती.
टायगर अभी जिंदा हैं
शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भावना गवळी यांच्या दौऱ्याला विरोध केला. विरोध करणाऱ्यांना विरोध करू द्या. कामानीच आम्ही निवडून आलो आहोत आणि कामानेच आम्ही आमचे पाय रोवून राहणार आहोत. टायगर अभी जिंदा हैं म्हणून त्यांनी जनतेची पुन्हा नव्यानं कामं करणार असल्याचं सांगितलं. भावना गवळी यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यावर गवळी म्हणाल्या, तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे. त्यामुळं त्यावर बोलणं योग्य होणार नाही. मतदारसंघात चिखलात, वारा, पाण्यात मी फिरली आहे. शिवसैनिक म्हणून काम केलं. खासदारकीची हवा कधी भरली नाही. विकासाच्या दृष्टिकोणातून निधी देण्याचं काम करणार. यवतमाळातील रेल्वेचा प्रश्न आपण सोडविला. केंद्राचा आणि राज्याचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी वापरणार असल्याचं त्या म्हणाल्या. वाशिमच्या उपकेंद्राचा विषयही समोर नेतो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.