Yavatmal Crime: चाकूनेच केला तीन वर्षीय चिमुकलीचा घात, यवतमाळमधील आर्णीतील अमानवीय कृत्याने यवतमाळ हादरले

आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील तीन वर्षीय मुलगी ही 20 डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती. अशी तक्रार मृत मुलीच्या वडिलांनी आर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. तिला शोधण्यासाठी कुऱ्हा या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

Yavatmal Crime: चाकूनेच केला तीन वर्षीय चिमुकलीचा घात, यवतमाळमधील आर्णीतील अमानवीय कृत्याने यवतमाळ हादरले
चाकूनेच केला तीन वर्षीय चिमुकलीचा घात
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 9:50 PM

यवतमाळ : अज्ञात कारणावरुन सख्ख्या चुलत काकूने तीन वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची घटना यवतमाळमधील आर्वी तालुक्यातील कुऱ्हा येथे घडली आहे. ज्या काकूच्या अंगणात ही चिमुकली खेळत होती, बागडत होती, त्याच काकूने तिचा घात केला. तिला ठार मारून गव्हाच्या कोटींमध्ये ठेवले. मृतदेह तब्बल पाच दिवस ठेवल्यानंतर दुर्गंधी येत असल्याने तिने मुलीचा मृतदेह घरामागील पाण्याच्या टाकी जवळ ठेवला. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच घरासमोरील चुलत काकू दिपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यात गाजत असलेल्या चिमुकलीच्या प्रकरणाचा छडा लागला.

आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील तीन वर्षीय मुलगी ही 20 डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती. अशी तक्रार मृत मुलीच्या वडिलांनी आर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. तिला शोधण्यासाठी कुऱ्हा या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तर विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथक व सायबर सेल येथील एक असे चार पथक गठित करून गावशेजारील जंगल परिसरात व इतर ठिकाणी तिचा शोध घेणे सुरू होते.

मृतदेहाला दुर्गंध येऊ लागल्याने गावातील एका घरामागे टाकला मृतदेह

ज्या दिवशी मुलीचे अपहरण केले त्यादिवशी तिला ठार केले व तिचा मृतदेह आरोपी काकूने आपल्या स्वयंपाक घरातील गव्हाच्या छोट्या कोटीमध्ये लपवून ठेवला. गावामध्ये सतत पोलिसांचा वावर असल्याने आरोपी म्हणजेच चुलत काकू दिपाली उर्फ पुष्पा गोपाळ चोले हिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास संधी मिळाली नाही. ज्या दिवशी मुलीच्या मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला तसं तिने मृत मुलीचा मृतदेह हा स्वतःच्या बचावासाठी गावातीलच एका घराच्या मागील बाजूस टाकून दिला.

श्वानपथकाच्या मदतीने आरोपीला पकडले

मुलीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच त्वरित श्वानपथक बोलावून तपास सुरू करण्यात आला. श्वानपथकने मुलीच्या शरीराभोवती पडलेले गव्हाचे दाणे हे आरोपीच्या घरातील स्वयंपाक घरापर्यंत पोचविले. पुष्पा चोले हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात अजून कोणी आरोपीचा सहभाग आहे का याचा आर्णी पोलीस तपास करीत आहेत. (Murder of three year old girl in Yavatmal)

इतर बातम्या

Ambernath : अंबरनाथमध्ये माजी नेव्ही ऑफिसरला मारहाण; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, तर मुख्य आरोपी फरार

Yavatmal Crime | चिमुकल्यांच्या अंगावर फेकलं अॅसिडसदृश द्रव्य, 3 दिवसातील तिसरी घटना, यवतमाळ हादरलं

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....