Yavatmal Crime खुनानंतर दोन गटांत वाद, काळीदौलतमध्ये जमावबंदीचे आदेश, गावात पोलिसांचा फौजफाटा

काळी दौलत येथे अजूनही तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक गावामध्ये दाखल झाली आहे. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

Yavatmal Crime खुनानंतर दोन गटांत वाद, काळीदौलतमध्ये जमावबंदीचे आदेश, गावात पोलिसांचा फौजफाटा
खुनाच्या घटनेनंतर अशाप्रकारे जाळपोळ करण्यात आली.
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 11:57 AM

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काळीदौलत इथं युवकाचा काल दुपारी खून करण्यात आला. त्यानंतर युवकाच्या नातेवाईकांनी बसस्थापक परिसरात जाळपोळ केली. दोन गटांत वाद पेटल्यानं गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झालाय. काळीदौलतमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. गावात सध्या शांतता आहे. आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलेत.

श्याम राठोड हा लक्ष्मण राठोडसोबत दुचाकीनं जात होता. बसस्थानक परिसरात दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. यावरून श्याम व त्याच्या भावाविरुद्ध वाद घातला गेला. वादाचे पर्यवसान तलवारीने वार करेपर्यंत गेले. यात श्यामचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

पोलीस अधीक्षक घटनास्थळी

आरोपी पसार झाल्यानंतर श्यामच्या नातेवाईकांनी सायंकाळी बसस्थानक परिसरात जाळपोळ केली. खुनाची वार्ता परिसरात पसरली. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेला जातीय रंग देण्यात आला. जुन्या वैमनस्यातून हा खून झाला असावा असा अंदाज आहे.

yawat

यवतमाळ जिल्ह्यातील काळीदौलत येथे असलेला पोलिसांचा बंदोबस्त.

पोलीस होण्याचे स्वप्न अपुरेच राहिले

श्याम हा २२ वर्षांचा तरुण पोलीस भरतीची तयारी करत होता. पण, या वादात त्याचा बळी गेला. पोलीस होण्याचे श्यामचे स्वप्न अपुरेच राहिले. रोजगारीतूनही काही युवक गुन्हेगारीकडं वळत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. काळी गावात दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. युवकाच्या हत्येचे पडसाद गावात उमटले. काळीमध्ये दुकानांची तोडफोड करण्यात आली. जाळपोळ करण्यात आली आहे. काळी दौलत येथे अजूनही तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक गावामध्ये दाखल झाली आहे. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

Nagpur Deekshabhoomi सहा डिसेंबरला महापरिनिर्वाणदिन, दीक्षाभूमीवरील गर्दी टाळा, प्रशासनाचे आवाहन

Social media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.