Yavatmal NCP | जिल्हाध्यक्ष हटाव, राष्ट्रवादी बचाव; यवतमाळ जिल्ह्यात असंतुष्टांची बॅनरबाजी, बैठक वादळी ठरणार?
यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद उभाळून आलाय. जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर यांना हटविण्यात यावे, असे बॅन शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादीची बैठक दुपारी तीन वाजता आहे. त्यापूर्वीच बॅनरबाजी झाल्यानं राष्ट्रवादीतील दुफळी चव्हाट्यावर आली आहे.
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विभागीय आढावा (Divisional Meeting ) घेण्यासाठी अमरावती येथे दहा एप्रिल रोजी येणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यवतमाळमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके (Sanjay Khodke) यांच्या नेतृत्वात ही बैठक आज दुपारी तीन वाजता होणार आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काही कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव, अशा प्रकारचे पोस्टर शहरातील विविध भागांत लावण्यात आले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे पोस्टर आता कुणी लावले, जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर ( Kranti Kamarkar) हे जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला नको आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.
दुपारी होणारी बैठक वादळी ठरणार
आज दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीची विभागीय बैठक आहे. या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाध्यक्षांना विरोध करणारे सक्रिय झाले. त्यामुळं या बैठकीत हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. बॅनरबाजी करण्यात आली. याचा अर्थ जिल्हाध्यांच्या विरोधात रोष आहे. हा रोष या बॅनरबाजीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. हा रोष इथच, थांबतो की दुपारी होणाऱ्या बैठकीत पुन्हा उभाळून येतो, हे बघावं लागेलं.
दहा एप्रिलला विभागीय बैठक
अमरावती येथे दहा एप्रिल रोजी राष्ट्रवादीचा मेळावा आहे. हा मेळावा विभागीय स्तरावरील आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार येणार असल्यानं ही बैठक आज नियोजनासाठी यवतमाळात बोलावण्यात आली आहे. पण, त्यापूर्वीच राष्ट्रवादीमधील असंतोष उफाळून आलाय. क्रांती कामारकर यांना हटविण्याची मागणी करण्यात आली. याचा अर्थ जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये काही आलबेल नाही. कामारकर यांना जिल्हाध्यक्ष म्हणून काही कार्यकर्त्यांना नको आहेत. त्यामुळं ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण, ही बॅनरबाजी नेमकी कुणी केली. हे अद्याप स्पष्ट नाही. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद उभाळून आलाय. जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर यांना हटविण्यात यावे, असे बॅन शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादीची बैठक दुपारी तीन वाजता आहे. त्यापूर्वीच बॅनरबाजी झाल्यानं राष्ट्रवादीतील दुफळी चव्हाट्यावर आली आहे.