Yavatmal Crime | आर्णी तालुक्यात महामार्गावर लूटमार, मशीन चालकास झाडास बांधून मारहाण, पोलीस चौकी काय कामाची?
पोकलॅन्ड मशीन ऑपरेटरसह चालकाला झाडाला बांधून मारहाण करीत लुटण्यात आली. ही थरारक घटना आर्णी तालुक्यातील लोणबेहळ-कोसदणी मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
यवतमाळ : पोकलॅन्ड मशीन ऑपरेटरसह चालकाला झाडाला बांधून मारहाण (Tied to a tree and beaten) करीत लुटण्यात आले. ही थरारक घटना आर्णी तालुक्यातील लोणबेहळ-कोसदनी मार्गावर चौदा फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी आर्णी पोलीस (Arni Police) ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. शेखराव चव्हाण आणि शरद मुधोळकर अशी जखमी चालकांची नावे आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील लोणबेहळ ते कोसदनी घाट परिसरात रोडच्या कडेला एक पोकलॅन्ड मशीन उभी करून त्यात चालक आणि ऑपरेटर झोपले होते. मध्यरात्री एका आयशर वाहनाने एक टोळी त्या ठिकाणी आली. त्या टोळीने पोकलॅन्ड मशीनमध्ये (Pokland machine) झोपलेल्या चालक आणि ऑपरेटरला अचानक मारहाण सुरू केली. त्यानंतर परिसरातील एका झाडाला बांधून पुन्हा चक्क दोन तास बेदम मारहाण केली. दरम्यान त्यांच्याजवळील हजारो रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल, पाचशे लीटर डिझल, बॅटरी आदी मुद्देमाल लंपास केला.
अशी घडली घटना
राष्ट्रीय महामार्गावर कोसदणी घाटात रस्त्याच्या कडेला पोकलँड मशीन उभी होती. मानोरा येथील शेषराव चव्हाण हा मशीनच्या कॅबीनमध्ये झोपला होता. काही हल्लेखोरांनी चालकाला मारहाण करून कॅबीनच्या बाहेर काढले. जवळच्या जंगलात झाडाला बांधून ठेवले. आरोपींच्या जवळील सोळा हजार रुपये, मशीनमधील डिझेल, बॅटरी घेऊन पळाले. हे आठ आरोपी आयशर वाहनाने आले होते. जखमीवर लोहणबेळ आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
पोलिसांची चौकी कोणत्या कामाची?
हा राष्ट्रीय महामार्ग रात्रीच्या वेळी प्रवाशांसाठी असुरक्षित झाला आहे. या महामार्गावर पोलिसांचे नियंत्रण नसते. लूटमारीच्या घटना घडत असतात. पोलीस कशासाठी राहतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नागपूर-बोरी-तुळजापूर या महामार्गावर धनोडा येथे पोलिसांची चौकी आहे. या पोलिसांकडे पेट्रोलिंगसाठी वाहन आहे. या चौकीलगतच अशा घटना घडत असतील, तर चौकी काय कामाची असा प्रश्न विचारला जात आहे.
दादरच्या डायमंड ज्वेलरीतील चोरी क्राईम पेट्रोल पाहून; चोरट्यानं सीसीटीव्हीचा ड्राईव्हही पळविला होता
माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय “बॉम्ब” फोडणार?