यवतमाळ : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (ekanath shinde) हे 40 हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटी (guvahati) येथे गेले आहेत. यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते माजी मंत्री संजय राठोड कुठे आहेत. संजय राठोड हे गुवाहाटीच्या दिशेनं असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि आणि माजी आमदार यांची मतं जाणून घेतली. कधी नव्हे येवढं मोठं बंड शिवसेनेत होतंय. मोठ्या प्रमाणात आमदार गुवाहाटीला गेलेत. शिवसेनेला बंड हे काही नव्यानं नाही. तत्पूर्वी छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे यांनी बंड केलेत. शिवसेना संपेल, अशा वल्गना झाल्या. पण, शिवसेना काही संपली नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी ही शिवसेना आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना काम करत आहे. आम्ही सर्व ठाकरे गटाच्या मागे उभं राहू, असा निर्धार यवतमाळातील शिवसैनिकांनी व्यक्त केलाय.
शिवसैनिक म्हणाले, शिवसेनेत बंडाळी झाल्यास पोकळी निर्माण होईल. संजय राठोड हे ठाकरेंच्या गटात नाहीत, अशी चर्चा आहे. पण, ते एकनाथ शिंदे यांच्या गटात जायला नको, असं इथल्या शिवसैनिकांना वाटतं. नि गेले तर आम्ही असं म्हणू गध्यानं वाघाचं कातडं पांघरलं तर गधा वाघ होत नसतो. हे संजय राठोड यांनी लक्षात ठेवावं. आम्ही शिवसैनिक आहोत. विदर्भातून अनेक आमदार खासदार निवडून आले आहेत. पुन्हा शिवसैनिक म्हणून उभारी घेऊ. ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. महाराष्ट्रावर पुन्हा झेंडा फडकवू, अशं मत यवतमाळातील शिवसैनिकांनी व्यक्त केलंय.
संजय राठोड हे गेले काही दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते मुंबई असल्याचं कळलं. तिथून ते गुवाहाटीच्या दिशेने गेले असल्याची माहिती आहे. संजय राठोड हे परत येतील, असा विश्वास यवतमाळातील शिवसैनिकांनी व्यक्त केला. दारव्हा, दिग्रस मतदारसंघात शिवसेनेच्या नावावर संजय राठोड निवडून आले. हे त्यांनी विसरू नये. पुढच्या काळात संजय राठोड आमच्यासोबत म्हणजे ठाकरेंसोबत असतील. संजय राठोड सोबत नसल्यास आम्ही शिवसैनिक ठाकरेंच्या मागे राहून जिल्ह्यात जोमानं उभे राहू, असंही यवतमाळातील शिवसैनिकांना वाटतं.
संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार आहेत. ते मंत्रीही झाले होते. पण, मध्यंतरी त्यांचं मंत्रीपद गेलं. यवतमाळात शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आहेत. राठोडांनी बंड केलं तेव्हा गर्दी त्यांच्या बाजूनं होती. त्यांना मंत्रीपद मिळावं, यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या बाजूनं होते. पण, आता ते शिवसेनेसोबत राहण्याची भाषा करतात. त्यांना संजय राठोड कुठं गेले याच्याशी काही देणंघेणं नाही.