Yavatmal Accident | आईवडिलांकडे बाळंतपणासाठी जात होती, खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा जीव

आपलं पहिलं बाळंतपण आईवडिलांकडं व्हावं, अशी इच्छा होती. माहेरी जाण्यासाठी निघाली. रस्त्यात खड्डे होते. या खड्ड्यांनी बाळ-बाळंतिणीचा जीव घेतला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात घडली.

Yavatmal Accident | आईवडिलांकडे बाळंतपणासाठी जात होती, खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा जीव
यवतमाळात रस्त्यावरील खड्ड्यांमुळं बाळ-बाळंतिणीचा बळी गेलाय.
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:51 PM

यवतमाळ : पहिले बाळंतपण माहेरी व्हावी अशी आईवडिलांची इच्छा असल्याने काही दिवसांपूर्वी हिंगोलीवरून (Hingoli) मन्याळीला आली. आयुष्यातील सुखद क्षणाची वाट पाहत असताना रविवारी रात्री तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाव दुर्गम भागात असल्याने फारशा सुविधा नव्हत्या. ऑटोरिक्षातून रुग्णालयाच्या दिशेने निघाले. पण, खड्ड्यांमुळे (Pits) त्रास वाढला. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली. वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा वाटेतच जीव गेला. उमरखेड (Umarkhed) तालुक्यातील टोकावरच्या ढाणकी-बिटरगाव रस्त्यावर रविवारी रात्री ही घटना घडली. नताशा ढोके (वय 30) रा. मन्याळी, असे खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या आईचे नाव आहे. नताशाचा विवाह हिंगोलीतील अविनाश ढोके झाला होता. प्रसूतीसाठी ती माहेरी मन्याळीला आली होती. हे गाव दुर्गम भागात वसलेले असल्याने फारशा सुविधा नाहीत.

ऑटोरिक्षा चालविणे चालकाला कठीण

जवळपास रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने रात्री प्रसूतीकळा सुरू होताच कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला. कुठेही संपर्क होत नसल्याने गावातील ऑटोमधून नताशाला घेऊन ढाणकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघाले. बिटरगाव-ढाणकी रस्त्याने जात असताना खड्ड्यांमुळे नताशाचा त्रास अधिक वाढला. ती जिवाच्या आकांताने विव्हळू लागली. रस्त्यावरील खड्डे चुकवित ऑटोरिक्षा चालविणे चालकाला कठीण जात होते. सारे प्रयत्न करूनही ढाणकी दोन किलोमीटरवर असताना ऑटोतच नताशाची प्रसूती झाली. पण, खराब रस्ता आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतीण दोघेही दगावले.

नागरिकांनी व्यक्त केला रोष

आपलं पहिलं बाळंतपण आईवडिलांकडं व्हावं, अशी इच्छा होती. माहेरी जाण्यासाठी निघाली. रस्त्यात खड्डे होते. या खड्यांनी बाळ-बाळंतिणीचा जीव घेतला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात घडली. या घटनेमुळं नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केलाय. या रस्त्यानं जाताना सामान्य व्यक्तीलाही खूप त्रास सहन करावा लागतो. कंबरदुखीची समस्या वाढली आहे.

Devrao Dudhalkar passed away | उत्कट समर्पणशीलतेचा; सेवादलीय कार्यकर्ता

Buldana Politics | काँग्रेस, भाजपच्या नेत्यांची जवळीकता! आमदार फुंडकरांचे सारथी बनले ज्ञानेश्वर पाटील; चर्चा तर होणारच

Nagpur Metro Video | नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू पडतेय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.