मंदिरातील देवीचे दागिनेही सुरक्षित नाहीत!, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मंदिरातील देवीचे दागिने सुरक्षित राहिले नसल्याचे समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका चोरट्याने चक्क मंदिरातील देवीचे चांदीचे मुकुट लंपास केले.
यवतमाळ : चोर कशाची चोरी करतील काही सांगता येत नाही. कुणी शौकेखातर, तर कुणी पोट भरण्यासाठी चोरी करतात. काही चोर घराजवळ चोरी करतात. तर काही चोर दूर चोरी करून गुजराण करतात. चोरी कोण कुठं करेल, याचा काही भरोसा राहिला नाही. घरात, दुकानात होणारी चोरी आता मंदिरातही होऊ लागली आहे. मंदिरातील देवीचे दागिने सुरक्षित राहिले नसल्याचे समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका चोरट्याने चक्क मंदिरातील देवीचे चांदीचे मुकुट लंपास केले. त्यामुळे देवीचे दागिनेही चोर लंपास करू शकतात, हे पुन्हा सिद्ध झाले.
चांदीचा मुकुट आणि सोने चोरी
यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथे चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकुट आणि सोने चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जगदीश हजारे यांनी बाबुगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यावरून पोलिसांनी छडा लावत चोरट्यांना जेरबंद केले.
मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट उडवला
यवतमाळ जिल्ह्यात भुरट्या चोरट्यांनी चांगला उच्छांद मांडला आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरीच्या घटनात सातत्याने वाढ होत आहेत. परिणामी पोलीस प्रशासनावर जनता चांगलेच ताशेरे ओढत आहे. यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथे एका मंदिरातील देवीचा ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट आणि एक ग्रॅम सोने चोरट्यांनी लांबवले.
पुजाऱ्याच्या लक्षात आली बाब
ही घटना भवानी मंदिर संस्थान राणी अमरावती येथे घडली. पुजारी नेहमीप्रमाणे देवीची पूजा करण्यासाठी गेले असता सदर चोरीची घटना उघडकीस आली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मंदिरातील दागिनेही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले.
बहुतेक मंदिरात सीसीटीव्ही लावलेले असतात. तरीही चोर चोरी करण्यास घाबरत नाही. देवीच्या मंदिरातील दागिनेही सुरक्षित ठेवले जात नाही. एवढी या चोरांची नीतीमत्ता घसरली आहे.