Yavatmal News : खदाणीजवळील दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल; शोध घेताच कळालं की,…

शनिवारी दुपारची ही घटना. निसर्गरम्य स्थळ असल्याने ते काही वेळ तिथचं बसून राहिले. पोहण्यासाठी तिघेही युवक खदाणीत उतरले. त्यांनी आपले कपडे आणि चपला दुचाकीवर ठेवल्या.

Yavatmal News : खदाणीजवळील दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल; शोध घेताच कळालं की,...
Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 3:31 PM

विवेक गावंडे, यवतमाळ, ३ सप्टेंबर २०२३ : वणी येथील तीन युवक दुचाकीने वांजरी भागात गेले. वांजरी गावालगत खदाणी आहेत. त्या खदाणींमध्ये सध्या पाणी साचले आहे. पाणी पाहून युवकांना पाण्यात डुबण्याचा मोह झाला. शनिवारी दुपारची ही घटना. निसर्गरम्य स्थळ असल्याने ते काही वेळ तितचं बसून राहिले. पोहण्यासाठी तिघेही युवक खदाणीत उतरले. त्यांनी आपले कपडे आणि चपला दुचाकीवर ठेवल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्याखाली बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळले. प्रत्यक्षदर्शीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घटना ग्रामस्थांना कळाली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले.

तिघांचेही मृतदेह सापडले

ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तातडीने पोलीस कर्मचाऱ्याना वांजरीला रवाना केले. तोपर्यंत शहरातील नेते मंडळी घटनास्थळी दाखल झाले. रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही. रविवारी पहाटे पोलिसांनी शोधमोहीम राबवण्यात आली. तिन्ही तरुणांचे मृतदेह आढळून आले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

अशी आहेत युवकांची नावं

वणी शहरातील तीन युवक मोपेड दुचाकीने वांजरी येथे गेले. तेथील पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत त्यांना पोहण्याचा मोह झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली. आज पहाटेपासून शोधमोहीम राबवण्यात आली. तिघांचे मृतदेह आढळले. आसीम अब्दुल सलाट शेख (वय 16), नुमान शेख सादिर शेख (वय 16) राहणार एकता नगर आणि प्रतीक संजय मडावी (वय 16) रा. प्रगतीनगर असे या तिन्ही युवकांची नाव आहेत.

तिघेही युवक हे फिरायला गेले होते. निसर्गरम्य वातावरण पाहून त्यांचे मन रमले. पण, अनोळखी ठिकाणी त्यांनी पाण्यात बुडण्याचा मोह केला नसता तर अशी घटना घडली नसली. पाण्याची खेळ नको असे जुने लोकं म्हणतात. त्यामुळे खात्रीशीर ठिकाण असेल, तरच पाण्यात उतरायला हवे. अन्यथा अशा दुर्घटना घडतात. युवकांमध्ये जोश असतो. पण, तो जोश योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. अन्यथा जीवन व्यर्थ ठरते.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.