Yavatmal Accident | यवतमाळात वीज पडून दोघांचा मृत्यू, मेघगर्जनेसह पाऊस; विदर्भात मॉन्सून दाखल
यवतमाळात झरी जामणी (Zari Jamani) तालुक्यातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. मुदाठी व राजनी येथील दोघांवर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गजानन टेकाम हे शेतात पेरणीचे काम करत होते. अशात वीज कोसळली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत, निबेश हे शेतात गेले होते. पावसानं हजेरी लावली. विजांचा कडकडाट होऊ लागला. त्यामुळं त्यांनी निंबाच्या झाडाचा आश्रय घेतला. अशात निंबाच्या झाडावर वीज कोसळली. यात निबेश यांचा जागीच मृत्यू झाला.
यवतमाळ : झरी जामणी (Zari Jamani) तालुक्यातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. मुदाठी व राजनी येथील दोघांवर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गजानन पोचीराम टेकाम (Gajanan Tekam) (रा. मुदाठी)असे वीज पडून मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. तर सोबत असलेले मारोती सुर्यभान टेकाम (Maroti Tekam) हे किरकोळ जखमी झाले आहेत. हे दोघे आपल्या शेतामध्ये पेरणीकरिता सारे फाडत असताना ही घटना घडली. राजनी येथील निबेश कडू आत्राम (वय ३०) शेतात सारणी करीत असताना पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. त्यामुळे निबेश हा पावसापासून बचावाकरिता निंबाच्या झाडाखाली थांबला. अशातच विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. यात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अशा घडल्या घटना
गजानन टेकाम हे शेतात पेरणीचे काम करत होते. अशात वीज कोसळली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले मारोती हे जखमी झाले. दुसऱ्या घटनेत, निबेश हे शेतात गेले होते. पावसानं हजेरी लावली. विजांचा कडकडाट होऊ लागला. त्यामुळं त्यांनी निंबाच्या झाडाचा आश्रय घेतला. अशात निंबाच्या झाडावर वीज कोसळली. यात निबेश यांचा जागीच मृत्यू झाला.
विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भात आज थोड्या वेळापूर्वी मॅान्सून दाखल झाला. विदर्भातील 11 जिल्ह्यात मॅान्सून दाखल झालाय. नागपूर हवामान विभागानं ही माहिती दिली. कालपासून विदर्भात ढगाळ हवामान आणि पाऊस सुरू आहे. पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज राहणार आहे. यंदा विदर्भात सरासरी पावसाचा अंदाज राहणार असल्याचं नागपूर हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी सांगितलं.
पेरणीला वेग
गेल्या तीन दिवसांपासून काही भागात पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकरी कामाला लागला आहे. पण, शेतात काम करत असताना मेघ गर्जतो. विजा चकमतात. अशावेळी जीव मुठीत घेऊन काम करावं लागतं. या दोन्ही घटना या वीज पडून मृत्यू झाल्याच्या आहेत. त्यामुळं शेतात काम करत असताना स्वताची काळजी कशी घेता येईल, याकडं लक्ष देणं आवश्यक आहे.