दसरा मेळाव्याला जात होते, पण, अचानक आला ह्रदयविकाराचा झटका…

मांजरे यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना लगेच टेम्भी नाका जवळील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दसरा मेळाव्याला जात होते, पण, अचानक आला ह्रदयविकाराचा झटका...
भिवंडीत लॉनजवळ ह्रदयविकाराचा झटकाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 5:40 PM

विवेक गावंडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील शिवसैनिक श्रीकृष्ण मांजरे यांचे दसरा मेळाव्याला जात होते. वाटेत हृदय विकाराच्या झटक्याने मांजरे यांचे निधन झाले. शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या वतीने ते मेळाव्यात सहभागी होण्यासाठी काल रवाना झाले. आज भिवंडीच्या शिवाशांती लॉन (Shivashanti Lawn) या ठिकाणी नास्ता करण्यासाठी उतरले होते. तेवढ्यात त्यांना ह्रदविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मांजरे यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना लगेच टेम्भी नाका जवळील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. आज त्यांचे पोस्टमार्टम झाले. अंत्यसंस्कार हरसूल येथेच होणार आहेत, अशी माहिती त्यांचा मोठा मुलगा गोपाल मांजरे यांनी दिली.

श्रीकृष्णा मांजरे हे वय 60 वर्षांचे होते. हरसूल येथील निष्ठावंत शिवसैनिक होते. गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.

दिग्रस आणि परिसरात होणाऱ्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची आवर्जून हजेरी असायची. संजय राठोड यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांना ओळखले जायचे.

शिवसेनेचा भगवा शेला नेहमी त्यांच्या खांद्यावर असायचा. शेती, शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवायचे. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले आणि एक विवाहित मुलगी, नातवंड, सुना असा मोठा परिवार आहे.

कालच दुर्गोत्सवात त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड, यवतमाळसह हिंगोली जिल्ह्यातून चाळीस हजार कार्यकर्ते शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी निघाले, अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिलीय. नांदेडमधून एका स्पेशल रेल्वेने रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. त्यापैकी एकाला ह्रदयविकाराचा झटका आला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.