ठाकरेंची मशाली पेटणार नाही अन् पवारांची तुतारी वाजणार नाही!; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा खोचक टोला
Girish Mahajan on NCP Sharad Pawar Shivsena Uddhav Thackeray Group : सुप्रिया सुळे-अजित पवार भेटीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले, मी आधीच सांगितलंय.... शरद पवार गटाच्या नव्या तुतारी चिन्हावरही टीका करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात आला आहे.
विवेक गावंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, यवतमाळ | 24 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे नवं चिन्ह मिळालं आहे. या नव्या चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण झालं. यावर भाजपकडून टोला लगावण्यात आला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारीची नावाबाबत बोलताना ती तुतारी प्राण पणाने फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी. हाच त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांची मशाली पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारीही आवाज करणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
महाविकास आघाडीत पुन्हा फूट
मी मागच्या वेळस सांगितलं होतं की स्फोट होणार आहे…. त्यावेळेस काँग्रेसमध्ये फूट झाली. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजित पवार यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ते दिवाळी दसरा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत असतात. त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल या सुप्रिया सुळे आणि अजित दादा भेटी संदर्भात अजित दादा सांगू शकतील. राज्यात आठ दिवसात पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
महायुतीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया
सहा मंत्र्यांना खासदारकीच्या उमेदवारीवरून बोलताना गिरीश महाजन यांनी आमच्या वरीष्ठ स्तरावरील नेते हा निर्णय घेतील. मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांच्यात चर्चा झाली असेल ती अजून बाहेर आली नाही ती केवळ अफवा आहे. लोकसभेच्या उमेदवारी ही केंद्रीय पातळीवरून उमेदवारीची घोषणा होते, असं महाजन म्हणाले.
मनोज जरांगेंच्या उपोषणावर भाष्य
मनोज जरांगेंना सहा वेळा भेटलो. त्यांच्यासोबत बोलणी केली. दोन वेळा गुलाल उधळून झाला आणि परत पुन्हा आठ दिवसांनी आंदोलन करतायेत. पाटलांनी आंदोलन केल्यानंतर शासनाने तातडीने पावले उचलली. मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला महाराष्ट्रात पहिल्यांदा इतक्या तातडीने काम पहिल्यांदा झाले. पण पुन्हा जरांगे पाटलाच्या इच्छेप्रमाणे काम होत नाहीये… कुठेतरी समाधान मानलं पाहिजे. आताच विशेष अधिवेशने बोलावलं कायद्यात बसणार आरक्षण माझं काम आम्ही करत आहोत, जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका न घेता जे जे आहेत. त्या आग्रही मागण्या निश्चित करा. पण आंदोलन उपोषण करून यातून फार काही साध्य होणार नाही, असं गिरीश महाजन म्हणालेत.