Yavatmal : 80 वर्षीय वृद्धाचे निधन, अग्नी दिला अन् पैपाहुण्यांना मधमाशांनी फोडून काढले, भांबावलेल्या ग्रामस्थांनी तिथून…
आगीच्या धुरामुळे मधमाशांनी आतापर्यंत अनेकदा हल्ला केला असल्याच्या घटना घडल्या आहेत. काही लोकांचा अशा घटनेत मृत्यू सुध्दा झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात शेतीची मशागत करताना किंवा उसाचा पालापाचोळा पेटवल्यानंतर अशा घटना घडतात.
यवतमाळ – यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील दारव्हा (darwa) तालुक्यातील शेलोडी गावात काल मधमाशांनी (Bee attack) स्मशानभूमीत जमलेल्या लोकांवर जोरदार हल्ला केला. मधमाशांनी इतका भयानक हल्ला केला की, पैपाहुण्यांची चांगलीचं तांराबळ उडाली. परिसरात हा विषय मोठा चर्चेचा ठरला आहे. 80 वर्षीय वृद्धाचे निधन झाले. अग्नीचा कार्यक्रम झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे. आगीच्या झळांमुळे शेजारी झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे.
नेमकं काय झालं
दारव्हा तालुक्यातील शेलोडी गावात 80 वर्षीय वृद्धाचे निधन झाले. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी गावातील आणि पैपाहुणे मोठ्या प्रमाणात जमले होते. दुपारच्यावेळेत अंतयात्रा निघाल्याने उन्हाचा तडाखा सुध्दा जोरात होता. अंत्यसंस्काराचे विधी आटोपल्यानंतर अग्नी देण्यात आला. त्यावेळी झाडावर असलेल्या मधमाशांनी लोकांना फोडून काढले. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी चांगलीचं धावपळ झाली.