यवतमाळ : एकच मिशन, जुनी पेन्शन म्हणत शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. एकीकडे पेन्शन आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची म्हणत शासकीय कर्मचारी आपल्या पेन्शनच्या मागणी ठाम असताना आता प्रशासनाकडून आंदोलनाती सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाईची बडगा उचलण्याच्या तयारीत शासन आहे. त्याबाबतची कारवाईही सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडत त्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवला आहे.
त्या कर्मचाऱ्यांवर आता जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत त्यांच्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येण्याचे संकेत असून कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आता परिपत्रक काढण्यात आले आहे.
त्यामुळे बेमुदत संप आंदोलनाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना वैयक्तिक नोटीस बजवण्याचे आदेश सर्व विभागातील विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले असल्याने आता कर्मचारी आंदोलनाबाबत काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनातील सर्व विभागप्रमुख वैयक्तिक नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्मचारी कामावर हजर होणार की त्यांच्यावर कारवाई होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जे कर्मचारी बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईचे आदेश दिल्याने हा संप होणार की नाही याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर आता गैरवर्तणूक समजून कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जे कर्मचारी संपात आहे त्यांना केंद्र शासनाचे धोरणाप्रमणे काम नाही वेतन नाही” ही पध्दती अवलंबविण्यात येणार आहे. तसेच संपात गेल्यामुळे आपल्या सेवेत खंड पडू शकतो असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.