Yavatmal : चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत; चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

| Updated on: Aug 10, 2022 | 10:51 AM

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला; परंतु प्रवाशांत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता.

Yavatmal : चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत;  चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला
चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत; चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला
Image Credit source: tv9marathi
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी येथील एसटी (ST) आगाराची बस गडचांदूरकडे प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक बसचे मागील चाक निखळून ते नदीत (River) पडले. परंतु यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने मोठा अपघात टाळला. या बसमध्ये त्यावेळी 18 प्रवासी बसून होते. ही घटना मंगळवारी दुपारी चारगावजवळ घडली आहे. आत्तापर्यंत एसटीचे अनेक अपघात झालेले आहेत. परंतु नुकताच झालेला अपघात हा विचित्र आहे. कारण अचानक गाडीचं चाक निघाल्याने चालकाची भंबेरी उडाली होती. चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांचा जीव वाचला आहे. सध्या त्या गाडीची पाहणी करण्यात येत आहे. कारण अचानक अपघात झाल्याने आगारावरती टीकेची झोड उठली आहे.

ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी 18 प्रवासी एसटीत होते

वणीवरून गडचांदूरला बस क्रमांक एम एच 40-8953 जात होती. या बसमध्ये जवळपास 18 प्रवासी तसेच नदीच्या पुलावर चालत्या बसची मागील दोन चाके निखळली. यातील एक चाक नदीत पडले, तर दुसरे चाक रस्त्यात अडकल्याने जाग्यावर थांबले. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला त्यावेळी चालक मुलनकर व वाहक अविनाश बोबडे हे एसटीत होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशी देखील घाबरले होते. ज्यावेळी दोन्ही चाकं निघाली, त्यावेळी गाडीत आरडाओरड आणि गोंधळ सुरु झाला होता. पण एसटी थांबल्यानंतर गोंधळ पुर्णपणे बंद झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला; परंतु प्रवाशांत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. चारगाव ते गडचांदूरपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदी शेजारी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात एसटीच्या गलथान कारभारावरती सुद्धा नागरिकांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे एसटीचं आगार पुन्हा चर्चेत आलं आहे. ना दुरुस्त गाडी का दिली अशी विचारणा लोक करीत आहेत.